कोलंबो | टीम इंडिया आशिया कप 2023 फायलमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली आहे. टीम इंडियाने मंगळवारी 12 सप्टेंबरला श्रीलंकेवर विजय मिळवून फायनलचं तिकीट कन्फर्म केलं. आता त्यानंतर टीम इंडिया आशिया कपमधील सुपर 4 राउंडमधील अखेरचा सामना हा बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. बांगलादेशचा आशिया कपमधून बाजार उठला आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी अटीतटीचा नाही. मात्र दोन्ही संघ हे आगामी आयसीसी वर्ल्ड कपच्या तोंडावर सरावाच्या दृष्टीने या सामन्यात खेळतील. या सामन्यातून दोन्ही संघांच्या खेळाडूंना कमी आणि जमेची बाजू जाणून घेता येईल.
टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात सर्वाधिक सामने कोणी जिंकले आहेत, हे आपण जाणून घेऊयात. आतापर्यंत उभयसंघात एकूण 39 वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. या 39 सामन्यात टीम इंडियाचा बोलबाला राहिला आहे. टीम इंडियाने 39 पैकी 31 सामन्यात विजय मिळवला आहे. तर बांगलादेशने 7 सामने जिंकले आहेत. तर 1 सामन्याचा निकाल लागला नाही.
आशिया कप 2023 साठी बांगलादेश टीम | शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास, तंजीद हसन तमीम, नजमुल हुसैन शांतो, तॉहिद हृदॉय, मुशफीकुर रहीम, मेहंदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसेन, अफीफ हुसेन, शरीफुल इस्लाम, एबादत हुसेन आणि मोहम्मद नईम.
आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, के.एल.राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा.