मुंबई : भारत आणि बांगलादेशमध्ये आशिया कपच्या सुपर 4 फेरीमधील शेवटचा सामना आहे. या सामन्यामध्ये विजय मिळवत आपला विजयीरथ कायम ठेवला आहे. तर दुसरीकडे आशिया कपमध्ये बांगलादेशचा चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघात काही बदल केले जावू शकतात. अशातच या सामन्यामध्ये पाऊस पडणार की नाही याबाबत जाणून घ्या. पावसामुळे अनेक सामन्यांमध्ये व्यत्यय आलंं आहे. आजच्या सामन्यावर पावसाचं संंकट असणार आहे.
भारत आणि बांगलादेशमध्ये आज दुपारी ३ वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. तर त्याआधी 30 मिनिटांआधी 2.30 वाजता सामन्याचा टॉस होणार आहे. हवामानाच्या अहवालानुसार भारत आणि बांगलादेशच्या सामन्यादरम्यान संध्याकाळी 5 ते 6 वाजता मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळेत सामना काहीवेळ थांबवला जावू शकतो मात्र त्यानंतर पावसाचा शक्यता कमी आहे.
भारत आणि पाकिस्तामधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर नेपाळवर भारताने विजय मिळवत सुपर 4 मधील स्थान निश्चित केलं होतं. त्यानंतर सुपर 4 मधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. पावसामुळे हा सामना दोन दिवस चालला होता. मात्र भारतीय संघाने या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला होता. त्यानंतर श्रीलंकेलाही पराभूत करत भारताने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, भारत आणि बांगलादेशमधील सामना दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. या सामन्यामध्येही रोहित शर्मा याने टॉस जिंकला तर बॅटींग घेण्यासाठी उत्सुक असेल. रोहित शर्मा प्लेइंग 11 मध्ये काही बदल करतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बांगलादेश टीम | शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास, तंजीद हसन तमीम, नजमुल हुसैन शांतो, तॉहिद हृदॉय, मुशफीकुर रहीम, मेहंदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसेन, अफीफ हुसेन, शरीफुल इस्लाम, एबादत हुसेन आणि मोहम्मद नईम.
आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, के.एल.राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा.