टीम इंडिया आणि बांगलादेशमधील पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. टॉस जिंकत बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने पहि’rल्या दिवशी 339-6 धावा केल्या. बांगलादेशने टीम इंडियाच्या आघाडीच्या फळीला झटपट आऊट करत सामना झुकवला होता. मात्र आर. अश्विनची नाबाद 102 धावांची शतकी खेळी. तर रविंद्र जडेजा नाबाद 86 धावांवर खेळीने टीम इंडियाला भक्कम स्थितीत पोहोचवले. आजच्या सामन्यात टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंत याने कसोटी क्रिकेटमध्ये 634 दिवसांनी कमबॅक करत खास यादीत आपल्या नावाची नोंद केली आहे.
टीम इंडियाच्या तीन विकेट अवघ्य 34 धावांमध्ये गेल्या होत्या. रोहित शर्मा 6 धावांवर तर शुबमन गिल शून्यावर बाद झाला. यानंतर विराट कोहली मैदानात आला आणि 6 धावा करून बाहेर पडला. या तीन विकेट हसन महमूदच्या खात्यात गेल्या. भारतीय टॉप ऑर्डरची पडझड झाल्यामुळे पंतला लवकर मैदानात उतरावं लागलं. यशस्वी जयस्वालच्या साथीने त्याने संयमी खेळी करत टीम इंडियाचा सावरण्याचा प्रयत्न केला. ऋषभ पंत 39 धावांवर माघारी परतला, त्याआधी पंतने 19 धावा पूर्ण करताच मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय.
टीम इंडियाचा विकेटकीपर म्हणून 4000 धावा पूर्ण करणारा तो दुसरा कीपर ठरला आहे. या यादीमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी पहिल्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा विकेटकीपर म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये महेंद्रसिंह धोनी 17,092 धावा पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या ऋषभ पंत 4003 धावा, तिसऱ्या सैय्यद किरमानी 3,132 धावा, चौथ्या 2,725 धावा आणि पाचव्या नयन मोंगिया- 2,714 धावा
दरम्यान,रिषभ पंत याने शेवटचा कसोटी सामना बांगलादेशविरुद्धच खेळला होता. 25 डिसेंबर 2022 रोजी मीरपूरमध्ये शेवटचा कसोटी सामना त्याने खेळलेला. या सामन्यामध्ये पंतकडून टीमला अपेक्षा असणार आहेत.
बांगलादेश प्लेइंग 11: नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा
टीम इंडिया प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.