कसोटी मालिकेसाठी भारत आणि बांग्लादेश हे दोन आशियाई संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारतीय संघ सहा महिन्यानंतर कसोटी मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. कारण या मालिकेतील विजय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित सोडवणार आहे. पराभव आणि ड्रॉ सामना विजयी टक्केवारीवर परिणाम करणार आहे.भारत आणि बांग्लादेश हे दोन संघ कसोटी क्रिकेटमध्ये 13 वेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताचं वजन अधिक आहे. भारताने 11 कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. तर दोन सामने ड्रॉ झाले आहेत. या दोन सामन्यात बांगलादेशने भारताला चांगलंच झुंजवल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे बांगलादेशला कमी लेखनं महागात पडू शकतं. भारत आणि बांग्लादेश यांच्यात मायदेशात आतापर्यंत एक कसोटी मालिका पार पडली आहे. तीन कसोटी सामन्यांची मालिका भारताने 3-0 ने जिंकली होती. ही मालिका 2017 साली भारतात पार पडली होती. त्यानंतर भारत बांग्लादेश कसोटी सामना भारतात झालेला नाही.
मागच्या दोन कसोटी सामन्यांचा विचार केला तर बांगलादेशला खूप वाईट पद्धतीने टीम इंडियाने पराभूत केलं आहे. दोन्ही सामने भारताने एका डावाने जिंकले आहेत. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील मागील पाच सामन्यांचं विश्लेषण जाणून घ्या
पहिला कसोटी सामना 1934 मध्ये चेन्नईत झाला होता. तेव्हापासून चेन्नईमध्ये एकूण 34 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 15 कसोटी सामने जिंकले आणि 11 सामने अनिर्णित राहिले. उर्वरित 7 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे.