मुबई : वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत भारताने विजयी चौकार मारला आहे. बांगलादेशनं 50 षटकात 8 गडी गमवून 256 धावा केेल्या होत्या आणि विजयासाठी 257 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 7 गडी राखून पूर्ण केलं. भारताने 41.2 षटकात हे आव्हान पूर्ण केला. विराट कोहलीचं शतक आणि शुबमन गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला आहे. भारताचा पुढचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.
रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल(WK), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, आर. अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव
शकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन कुमेर दास, तन्झिद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो (विकेटकीपर), तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहिदी हसन मिराझ, नसुम अहमद, शाक महेदी हसन, तस्किन रहमान, मुस्तफीर रहमान , हसन महमूद , शोरीफुल इस्लाम आणि तनझिम हसन साकीब.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने विजयी चौकार मारला आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्ताननंतर बांगलादेशला पराभूत केलं आहे. त्यामुळे उपांत्य फेरीची वाट आणखी सोपी झाली आहे.
भारत विजयाच्या जवळ आला आहे. स्पर्धेतील सलग चौथा विजय ठरणार आहे. तर विराट कोहलीला शतकासाठी अवघ्या 9 धावांची आवश्यकता आहे.
भारताने तीन गडी गमवून 200 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी 57 धावांची आवश्यकता आहे. विराट कोहली आणि केएल राहुल मैदानात आहेत.
विराट कोहली याने वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील तिसरं अर्धशतक ठोकलं आहे. अर्धशतकी खेळीसह विराट कोहलीचा फॉर्म कायम असल्याचं दिसत आहे.
पुणे | टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली आहे. कॅप्टन रोहित शर्मा याच्यानंतर शुबमन गिल आऊट झाला आहे. शुबमनने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली.
पुणे | टीम इंडियाचा ओपनर शुबमन गिल याने संयमी अर्धशतक केलंय. शुबमनने बांगलादेश विरुद्ध 52 बॉलमध्ये अर्धशतक केलं.
पुणे | धमाकेदार सुरुवातीनंतर टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आहे. टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. कॅप्टन रोहित शर्मा 48 धावांवर आऊट झाला आहे. रोहितने रोहित 40 बॉलमध्ये 7 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने ही खेळी केली.
पुणे | टीम इंडियाच्या सलामी जोडीने 257 धावांचा पाठलाग करताना शानदार सुरुवात केली आहे. शुबन गिल आणि कॅप्टन रोहित शर्मा या सलामी जोडीने पावर प्लेच्या पहिल्या 10 ओव्हरमध्ये 63 धावा केल्या आहेत.
पुणे | रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामी जोडी मैदानात आली आहे. बांगलादेशने टीम इंडियाला विजयसाठी 257 रन्सचं टार्गेट दिलंय.
पुणे | बांगलादेशने टीम इंडियाला विजयासाठी 257 धावांचं आव्हान दिलं आहे. बांगलदेशने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 256 रन्स केल्या. त्यामुळे आता टीम इंडिया या धावा पूर्ण करत विजयी चौकार मारते की बांगलादेश या 257 रन्सचं बचाव करते याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.
मोहम्मद सिराज याने दुसरी विकेट घेत बांगलादेश संघाला सातवा झटका दिलाय. सिराजच्या बाऊंसर नसूम १४ धावांवर बाद झाला.
बांगलादेश संघाला पाचवा धक्का बसला आहे. शार्दुल ठाकूरने तौहीद ह्रदोयला आऊट केलं. बांगलादेश संघाची धावसंख्या आता 179/5 आहे.
भारताची कीपर के एल राहुलने याने सिराज याचा एक कमाल कॅच घेतला. मोहम्मद सिराज याच्या गोलंदाजीवर सिराज आऊट झाला.
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने टीमला दुसरे यश मिळवून दिले आहे. कॅप्टन नजमुल हसन शांतोला आपल्या जाळ्यात अडकवले. बांगलादेशला 110 धावांवर दुसरा धक्का बसला आहे.
बांगलादेश संघाचा ओपनर लिटन दास याने 62 बॉलमध्ये आपलं यंदाच्या वर्ल्ड कपमधील दुसरं अर्धशतक केलं आहे. सलामीपासून एक बाजू त्याने लावून धरली आहे.
भारताचा चायनामन गोलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुलदीप यादव याने पहिली विकेट मिळवू दिली आहे. सलामीवीर तन्झिद हसन याला आऊट केलं आहे. तन्झिदने वन डे मधील पहिलं अर्धशत केलं, तो 51 धावांवर आऊट झाला. आता मैदानात कर्णधारपदाची जबाबदारी मिळालेला शांतो आला आहे.
हार्दिक पांड्याला टाचेला दुखापत झाली आहे. तो मैदानाबाहेर गेला आहे. विराट कोहलीने त्याच्या ओव्हरचे उर्वरित तीन चेंडू टाकले.
बांगलादेशने 6 ओव्हरनंतर तर एकही विकेट न गमावता 19 धावा केल्या आहेत. लिटन दास आणि तनजीद हसन शांतो क्रीजवर आहेत.
भारत-बांगलादेश सामन्याला सुरूवात झाली असून बांगलादेशचे सलामीवीर मैदानात उतरले आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराह पहिली ओव्हर टाकत आहे.
भारत आणि बांगलादेशमधील सामन्यामध्ये बांगलादेश संघाला मोठा धक्का बसला आहे. शाकिब अल हसन दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्याच्या जागी संघातील नजमुल हुसेन शांतो याच्याकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो (C), मेहदी हसन मिराझ, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (Wk), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम
बांगलादेश संघाने टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ मैदानात बॉलिंगसाठी उतरलेला दिसेल.
भारत आणि बांगलादेशमधील शेवटच्या चार वन डे सामन्यांमध्ये भारताने अवघा एक सामना जिंकला आहे. तर बांगलादेश संघाने तीन सामने जिंकले आहेत. बांगलादेश संघाला आजच्या सामन्यात हलक्यात घेणं भारताला परवडणार नाही.
वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत भारत आणि बांगलादेशमध्ये चार सामने झाले आहेत. तर यामधील भारताने चारमधील तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात बांगलादेशने भारताचा पराभव केला होता.