कोलंबो | बांगलादेशने टीम इंडियावर 6 धावांनी विजय मिळवत 266 धाावंचा शानदार बचाव केला आहे. टीम इंडियाची 266 धावांचा पाठलाग करताना वाईट सुरुवात झाली. टॉप आणि मिडल ऑर्डरने सपशेल निराशा केली. मात्र त्यानंतर शुबमन गिल याने शतक आणि अक्षर पटेल याच्या झुंजार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने चांगली लढत दिली. मात्र निर्णायक क्षणी गिल आणि अक्षर आऊट झाले. त्यानंतर बांगलादेशच्या गोलंदाजांनी उरलेल्या शेपटीच्या खेळाडूंना गुंडाळलं आणि टीम इंडियावर विजय मिळवला. टीम इंडिया 49.5 ओव्हरमध्ये 259 धावांवर ऑलआऊट झाली.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास (विकेटकीपर), तांझिद हसन, अनमूल हक, तॉहिद हृदॉय, शमीम होसेन, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, नसुम अहमद, तांझिम हसन शाकिब आणि मुस्तफिजूर रहीम.
कोलंबो | बांगलादेश क्रिकेट टीमने आशिया कप सुपर 4 मधील शेवटच्या सामन्यात टीम इंडियावर 6 धावांनी विजय मिळवत शेवट गोड केला आहे. बांगलादेशने टीम इंडियाला विजयासाठी 266 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाला ऑलआऊट 49.5 ओव्हरमध्ये 259 धावाच करता आला.
कोलंबो | अक्षर पटेल निर्णायक क्षणी मोठा फटका मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला आहे. अक्षरने 42 धावा केल्या.
कोलंबो | 266 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला 249 धावांवर आठवा झटका लागला आहे. शार्दुल ठाकुर 11 धावांवर आऊट झाला आहे.
कोलंबो | टीम इंडियाला निर्णायक क्षणी मोठा झटका लागला आहे. शुबमन गिल शतक करुन आऊट झाला आहे. शुबमन गिल 121 धावा करुन माघारी परतला.
कोलंबो | टीम इंडियाने सहावी विकेट गमावली आहे. रवींद्र जडेजा याने पुन्हा निराशा केली. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जडेजा 7 धावांवर क्लिन बोल्ड झाला.
कोलंबो | टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. शाकिब अल हसन याने सूर्यकुमार यादव याला 26 धावांवर क्लिन बोल्ड केलं.
कोलंबो | ईशान किशन याच्या रुपात टीम इंडियाने चौथी विकेट गमावली आहे. मेहदी हसन मिराज याने ईशान किशन याला 5 धावांवर आऊट केलंय.
कोलंबो | मेहदी हसन याने टीम इंडियाला तिसरा झटका दिला आहे. हसनने केएल राहुल याला 19 धावांवर आऊट केलं.
कोलंबो | बांगलादेशचा डेब्युटंट तांझिम हसन साकिब याने धमाकेदार सुरुवात केली आहे. तांझिमने कॅप्टन रोहित शर्मा याला झिरोवर कॅच आऊट केलं. तर त्यानंतर डेब्युटंट तिलक वर्मा याला 5 धावांवर क्लिन बोल्ड केलं.
कोलंबो | टीम इंडियाची 266 धावांचा पाठलाग करताना वाईट सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा डावातील पहिल्या ओव्हरमधील दुसऱ्याच बॉलवर कॅच आऊट झाला. रोहितला भोपळाही फोडता आला नाही.
आशिया कप 2023 स्पर्धेत बांगलादेशनं 50 षटकं पूर्ण खेळत 8 गडी गमवून 265 धावा केल्या. टीम इंडियासमोर विजयासाठी 266 धावांचं आव्हान दिलं आहे. पाच बदलांसह टीम इंडिया मैदानात उतरली आहे. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या खेळीकडे लक्ष लागून आहे.
प्रसिद्ध कृष्णा याला पहिलं यश मिळालं आहे. नसुम अहमदचा त्रिफळा उडवत तंबूचा रस्ता दाखवला आहे. बांगलादेश 250 धावांच्या उंबरठ्यावर.
तोहिद हृदोय 54 धावा करून बाद झाला आहे. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या बाद झाला आहे. सीमारेषेवर तिलक वर्माने झेल घेतला.
तोहिद हृदोय याने अर्धशतक शतक झळकावलं. आशिया कप स्पर्धेतील तोहिदचं हे दुसरं अर्धशतक आहे. बांगलादेशचा डाव सावरत 193 वर सहा गडी बाद अशी स्थिती.
रविंद्र जडेजाने बांगलादेशची सातवी विकेट घेत 200 विकेट पूर्ण के्ल्या आहेत. कपिल देव यांच्यानंतर 2000 पेक्षा जास्त धावा आणि 200 विकेट घेणारा जडेजा दुसरा खेळाडू ठरला आहे.
33 ओव्हरमध्ये बांगलादेशने 160 धावा केल्या असून शाकिब अल हनस आणि तौहीद यांनी 100 धावांची भागीदारी करत बांगलादेशचा डाव सावरला आहे. शाकिब नाबाद 80 आणि तौहीद नाबाद 40 धावांवर खेळत आहेत.
बांगलादेश संघाच्या चार विकेट्स गेल्या असून कर्णधार शाकिब अल हसन याने डाव सावरला आहे. संघाच्या 26 ओव्हरमध्ये 124 धावांवर 4 विकेट्स गेल्या आहेत. शाकिबने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
बांगलादेश संघाला चौथा झटका बसला आहे. मेहदी हसन मिराज 13 धावांवर आऊट झाला असून त्याची अक्षर पटेलने विकेट घेतली. रोहित शर्मा याने स्लीपमध्ये कडक कॅच घेतला.
मोहम्मद शमी याने आपल्या दुसऱ्या ओव्हरमधील पहिल्याच चेंडुवर लिटन दास याला बोल्ड केलं. लिटन दास याला शमीने खातंही उघडू दिलं नाही,
दोन्ही संघांचं देशाचं राष्ट्रगीत झाल्यानंतर बांगलादेशचे ओपनर मैदानात आले आहेत. तर भारताकडून मोहम्मद शमी पहिली ओव्हर टाकत आहे.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास (विकेटकीपर), तनझिद हसन, अनामूल हक, शकीब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसैन, मेहदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तनझिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन , रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.
रोहित शर्मा याने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियात पाच बदल करण्यात आले आहेत. “आम्ही पाच बदल केले आहेत. तिलक वर्मा या सामन्यात खेळणार आहे. शमी, शार्दुल आणि प्रसिध्दचं संघात पुनरागमन झालं आहे. तसेच सूर्यकुमारचाही समावेश करण्यात आला आहे.”, असं रोहित शर्मा म्हणाला.
भारत आणि बांगलादेशमध्ये आज आशिया कपमधील शेवटचा सामना रंगणार आहे. फायनलआधी भारताचा सुपर 4 फेरीमधील अखेरचा सामना असून बांगलादेश आपला शेवट गोड करणार की भारत आपल विजयरथ सुरू ठेवणार हे पाहावं लागणार आहे.