टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील टी 20I मालिकेला रविवार 6 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना जिंकून विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असणार आहे. दोन्ही संघांनी पहिल्या सामन्याआधी जोरदार सराव केला आहे. हा सामना न्यू माधवराव शिंदे क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. बांगलादेश टी 20I वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच टी 20I सीरिज खेळणार आहे. तर टीम इंडियाने याआधी झिंबाब्वे आणि श्रीलंकेविरुद्ध टी 20I मालिका खेळली आहे.
सूर्यकुमार यादव या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर सूर्याला अनुभवी हार्दिक पंड्या आणि संजू सॅमसन या अनुभवी खेळाडूंची सोबत मिळेल. तर बांगलादेशच्या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. नजमुल हुसेन शांतो बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघ अखेरीस टी 20I वर्ल्ड कपमध्ये आमनेसामने आले होते. तेव्हा भारताने बांगलादेशवर विजय मिळवला होता. आता या टी 20I मालिकेनिमित्ताने उभयसंघांची या सर्वात छोट्या प्रकारातील कामगिरी कशी राहिली आहे? हे जाणून घेऊयात.
आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात एकूण 14 सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने या 14 पैकी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर बांगलादेशला फक्त 1 सामन्यातच जिंकता आलं आहे. त्यामुळे आता सलामीच्या सामन्यात कोण जिंकणार? याकडे साऱ्यांचं बारीक लक्ष असणार आहे.
बांगलादेश विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.
टी 20i मालिकेसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, तंजीद हसन, परवेज होसैन इमोन, तॉहीद हृदॉय, झाकेर अली, महेदी हसन, रिशाद होसैन, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, रकीबुल हसन आणि महमुदुल्लाह.