रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने बांगलादेशचा कसोटी मालिकेत धुव्वा उडवला. रोहितसेनेने बांगलादेशवर 2-0 अशा फरकाने कसोटी मालिकेत विजय मिळवला. त्यानंतर आता उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 6 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. इंडिया आणि बांगलादेशने या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे.त्यानुसार, नजमुल हुसेन शांतो बांगलादेशचं कर्णधारपद सांभाळणार आहे. या मालिकेतील सामने कुठे होणार? सामन्यांना किती वाजता सुरुवात होणार? हे आपण जाणून घेऊयात.
सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर निवड समितीने कुणालाही उपकर्णधार केलेलं नाही. मात्र सूर्याला अनुभवी हार्दिक पंड्या याची साथ मिळणार आहे. मयंक यादव आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. तर यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल यांच्या अनुपस्थितीत विकेटकीपर संजू सॅमसन याला ओपनिंग करण्याची संधी मिळू शकते. मात्र याबाबत पहिल्या सामन्यातच सर्व स्पष्ट होईल. तसेच टीम इंडियाचा कसोटीप्रमाणे टी 20i सीरिजमध्येही बांगलादेशवर एकतर्फी विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे.
उभयसंघातील पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेर येथे होणार आहे. त्यानंतर 9 ऑक्टोबरला नवी दिल्ली येथे दुसरा सामना पार पडणार आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना 12 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या तिन्ही सामन्यांना संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.
पहिला सामना, 6 ऑक्टोबर, ग्वाल्हेर
दुसरा सामना, 9 ऑक्टोबर, नवी दिल्ली
तिसरा सामना, 12 ऑक्टोबर, हैदराबाद
बांगलादेश विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.
टी 20i मालिकेसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, तंजीद हसन, परवेज होसैन इमोन, तॉहीद हृदॉय, झाकेर अली, महेदी हसन, रिशाद होसैन, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, रकीबुल हसन आणि महमुदुल्लाह.