IND vs BAN कसोटी मालिकेवेळी सचिन तेंडुलकरचा तगडा रेकॉर्ड मोडला जाणार? पाहा कोणता?

| Updated on: Sep 10, 2024 | 8:51 PM

टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये येत्या कसोटी मालिका सुरू होणार आहे. पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरला तर दुसरा कसोटी सामना 23 सप्टेंबरला होणार आहे. या कसोटी मालिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेले असणार आहे. पाकिस्तान संघाला बांगलादेश त्यांच्याच भूमीत पराभूत करून आला आहे. त्यामुळे आत्मविश्वासाने बांगलादेशचा संघ मैदानात उतरणार आहे. या मालिकेमध्ये क्रिकेटच्या देवाचा रेकॉर्ड मोडला जावू शकतो.

1 / 5
टीम इंडिया आणि बांगलादेशमधील कसोटी सामन्यामध्ये  एक मोठा रेकॉर्ड मोडला जावू शकतो. महत्त्वाचं हा रेकॉर्ड भारताच्या नाहीतर बांगलादेशच्या खेळाडूला मोडण्याची संधी आहे. नेमका तो रेकॉर्ड काय आहे? मोडण्याची कोणाला संधी आहे जाणून घ्या.

2 / 5
आतापर्यंत टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये झालेल्या कसोटी सामन्यामध्ये 2000 ते 2010 पर्यंत सचिन तेंडुलकर याने 7 कसोटी सामन्यांच्या 9 डावात एकूण 820 धावा केल्या आहेत.

3 / 5
बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमने 2010 मध्ये भारताविरुद्ध पहिली कसोटी खेळली होती, तेव्हापासून त्याने 8 कसोटी सामन्यांच्या 15 डावांमध्ये एकूण 604 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर दोन शतके आणि दोन अर्धशतके आहेत.

4 / 5
मुशफिकुर रहीम सचिन तेंडुलकर याचा रेकॉर्ड मोडण्यापासून 216 धावांनी मागे आहे. आताचा मुशफिकुर याचा फॉर्म पाहता तो हा रेकॉर्ड मोडू शकतो.  पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मुशफिकर रहीमने नुकतीच 191 धावांची शानदार खेळी केली होती.

5 / 5
सचिन तेंडुलकरला मागे टाकण्यासाठी मुशफिकुर रहीमकडे आता आणखी चार डाव आहेत. त्याने एकही मोठी इनिंग खेळली तर तो सचिनच्या आणखी जवळ जावू शकतो. त्यासोबतच त्याला रेकॉर्ड मोडण्याची मोठी संधी आहे.