पुणे : भारत आणि इंग्लंड (India vs England ODI) यांच्यातील दुसरा वन डे सामना पुण्यात (Pune ODI) खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने टॉस जिंकून भारताला (Team India) प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. भारताचे सलामीवीर झटपट तंबूत परतल्यानंतर, कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि के एल राहुल यांनी डाव सावरला. मात्र विराट कोहली पुन्हा त्याच गोलंदाजाचा शिकार ठरला. इंग्लंडचा (England) फिरकीपटू आदिल राशीद (Adil Rashid) हा विराट कोहलीला सर्वाधिक वेळा आऊट करणारा फिरकीपटू ठरला आहे. दुसऱ्या वन डे सामन्यात विराट कोहली 66 धावा करुन माघारी परतला. आदिल राशीदने त्याला विकेटकीपर जॉस बटलरकरवी (jos buttler) झेलबाद केलं. (India vs England 2nd ODI Pune Englands Adil Rashid dismisses Virat Kohli for the ninth time in international cricket)
आदिल राशीदने आतापर्यंत 9 वेळा विराट कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आहे. कोहलीसारख्या वर्ल्ड क्लास फलंदाजाला सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिकवेळा बाद करण्याचा पराक्रम आदिल राशीदने गाजवला आहे.
फिरकीपटू राशीदने कोहलीला 9 वेळा बाद केलं असलं, तरी दुसरा नंबरही इंग्लंडच्याच फिरकीपटूचा आहे. इंग्लंडच्या मोईन अलीने 8 वेळा, ग्रॅमी स्वानने 8 वेळा, ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झाम्पा आणि नॅथन लायनने प्रत्येकी 7 वेळा कोहलीला बाद केलं आहे.
राशीदने कोहलीला 9 वेळा बाद केलं असलं, तरी फिरकी आणि वेगवान गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. कारण न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदीने विराट कोहलीला आतापर्यंत 10 वेळा बाद केलं आहे.
टीम साऊदी (न्यूझीलंड) – 10 वेळा
आदिल राशीद (इंग्लंड) – 09
ग्रॅमी स्वान – (इंग्लंड) – 8
बेन स्टोक्स (इंग्लंड) – 08
जेम्स एंडरसन (इंग्लंड) – 08
मोइन अली (इंग्लंड) – 08
दुसरीकडे विराट कोहलीच्या विक्रमाबाबत बोलायचं झाल्यास, वन डे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत, त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथला मागे सोडलं आहे. स्मिथने वन डे सामन्यात कर्णधार म्हणून 5416 धावा केल्या होत्या. कोहलीने आजच्या सामन्यात 41 धावा करताच, त्याने स्मिथच्या पुढे मजल मारली. सर्वाधिक धावसंख्या करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत कोहली आता पाचव्या स्थानावर आहे.
या यादीत पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे. त्याने कर्णधारपदावर असताना 8497 धावा केल्या आहेत. त्यानंतर कॅप्टन कूल माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी 6641 धावा, स्टीफन फ्लेमिंग 6295 आणि अर्जुन राणातुंगा 5608 धावा यांचा नंबर लागतो.
संबंधित बातम्या
IND vs ENG 2nd ODI Live Score : भारताचा चौथा गडी माघारी, के.एल. राहुल 108 धावांवर बाद