राजकोट | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 15 फेब्रुवारीपासून तिसरा कसोटी सामना खेळणार आहे. उभयसंघातील तिसरा सामना हा राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. 5 सामन्यांची मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघ तिसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याच्या तयारीने मैदानात उतरतील, मात्र विजेता कुणी एकच होणार. त्यामुळे या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. या सामन्यानिमित्ताने इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी कशी राहिली आहे, हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया-इंग्लंड यांच्यात 1932 साली पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला. तेव्हापासून ते आतापर्यंत उभयसंघात एकूण 133 सामने खेळवण्यात आले आहेत. या 133 सामन्यांपैकी सर्वाधिक सामन्यात टीम इंडियाचा बोलबाला राहिला आहे. तर इंग्लंडनेही चांगली झुंज दिली आहे. टीम इंडियाने इंग्लंडला 51 सामन्यात लोळवलं आहे. तर इंग्लंडनेही 32 सामन्यात प्रहार करत टीम इंडियाला पराभूत केलंय. तर 32 सामने हे ड्रॉ झालेत.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 2016 साली राजकोटमध्ये झालेला सामना हा देखील अनिर्णित राहिला होता. तेव्हा इंग्लंडकडून चौघांनी शतकी खेळी केली होती. त्यापैकी 2 सध्या टीममध्ये आहेत. यामध्ये जो रुट आणि कॅप्टन असलेला बेन स्टोक्स याचा समावेश आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
शेवटच्या 3 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, रवींद्र जडेजा (फिटनेसवर अवलंबून).