रांची | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवशी निराशाजनक सुरुवातीनंतर दणक्यात कमबॅक करणाऱ्या इंग्लडने दुसऱ्या दिवशीही धमाका केला आहे. इंग्लंडने पहिल्या डावात ऑलआऊट 353 धावा केल्या. टीम इंडियाची या 353 धावांच्या प्रत्युत्तरात घसरगुंडी झाली. टीम इंडिया दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 7 विकेट्स गमावून 219 धावा केल्या आहेत. टीम इंडिया आणखी 134 धावांची पिछाडीवर आहे. आता ध्रुव जुरेल आणि कुलदीप यादव ही जोडी नाबाद आहे. तर शोएब बशीर याने 20 वर्षीय युवा गोलंदाजाने टीम इंडियाला 4 झटके देत बॅकफुटवर टाकण्याचा काम केलं.
रवींद्र जडेजाने इंग्लंडला पहिल्या दिवशी झटपट 3 विकेट्स घेत 353 धावांवर ऑलआऊट केलं. मात्र टीम इंडियाची इंग्लंडच्या 353 धावांच्या प्रत्युत्तरात दाणादाण उडाली. कॅप्टन रोहित शर्मा 2 धावांवर आऊट झाला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. शुबमन गिल 38 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर यशस्वीने रजत पाटीदारसोबत बॅटिंग करताना अर्धशतक ठोकलं. मात्र त्यानंतर विकेट्स जातच होत्या. त्यामुळे यशस्वीचा संघर्ष सुरु होता.
रजत पाटीदार 17 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर आर यशस्वीला आऊट करत इंग्लंडने मोठी विकेट मिळवली. यशस्वीने 73 धावांची खेळी केली. यशस्वीनंतर सरफराज खान आणि आर अश्विन हे दोघेही आऊट झाले. या दोघांकडून मोठी आशा होती. मात्र या दोघांनी निराशा केली. सरफराजने 14 आणि अश्विनने 1 धाव केली. त्यानंतर मात्र ध्रुव जुरेल आणि कुलदीप यादव या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरला.
टीम इंडियाचा इंग्लंड विरुद्ध संघर्ष
Stumps on Day 2 in Ranchi!
A valuable unbeaten partnership between Dhruv Jurel and Kuldeep Yadav helps #TeamIndia move to 219/7 👏
Scorecard ▶️ https://t.co/FUbQ3MhXfH#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/fhnl0yrMbP
— BCCI (@BCCI) February 24, 2024
ध्रुव आणि कुलदीप या दोघांनी आठव्या विकेटसाठी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 42 धावांची नाबाद भागीदारी केली. ध्रुव जुरेल 58 बॉलमध्ये 30 रन्स करुन नॉट आऊट आहे. तर कुलदीप यादव 72 चेंडूत 17 धावा करुन नाबाद आहे. तर इंग्लंडकडून 20 वर्षीय युवा शोएब बशीर याने याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. टॉम हार्टलीच्या खात्यात 1 विकेट्स गेल्या. तर अनुभवी जेम्स एंडरसनला 1 विकेट मिळाली.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.