मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. येत्या 23 फेब्रुवारीला चौथा कसोटी सामना सुरू होणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. चौथ्या कसोटी सामन्यामध्ये के.एल. राहुल फिट झाला तर टीममधील रजत पाटीदार याला डच्चू दिला जावू शकतो. रजत पाटीदा याने दोन्ही कसोटी सामन्यात खराब प्रदर्शन केलं आहे. अशातच टीम इंडियाचा स्ट्राईक बॉलर जसप्रीत बुमराह याला विश्रांती दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. बुमराह याच्या जागी युवा खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे.
जसप्रीत बुमराह याने सलग तीन कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये बुमराहने 80 ओव्हर टाकल्या आहेत. त्यामुळे त्याला चौथ्या कसोटी सामन्यामध्ये विश्रांती दिली जावू शकते. बुमराह याच्या जागी दोन युवा खेळाडूंची नाव चर्चेत आहेत. त्यातील आघाडीवर असलेलं एक नाव म्हणजे मुकेश कुमार आहे. मुकेश याला पहिल्या कसोटी सामन्यामध्ये संधी मिळाली होती मात्र त्याला अवघी एक विकेट घेता आली होती.
दुसरा खेळाडू आहे तो म्हणजे आकाशदीप आहे. आकाशदीप याने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला नाही. देशांतर्गत किकेटमध्ये केलेल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर टीम त्याने टीम इंडियामध्ये जागा मिळवली. आता आकाशदीप याला प्रतीक्षा आहे ती म्हणजे पदार्पण सामन्याची, चौथ्या कसोटी सामन्यामध्ये ही संधी त्याला मिळू शकते. टीम मॅनेजमेंट नेमका काय विचार करतं हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे.
दरम्यान, टीम मॅनेजमेंटने मोहम्मद सिराज याला एकट्यालाच खेळवत स्पिनरला संघात जाग द्यायचं ठरवलं तर तसंही होऊ शकतं. अक्षर पटेल किंवा वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. अश्विन आणि जडेजा यांच्यामुळे या खेळाडूंना बेंच गरम करत बसावं लागत आहे. रोहित आणि राहुल कोणत्या मास्टरप्लॅनने मैदानात उतरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.