रांची | टीम इंडियाची इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात ही पराभवाने झाली. पाहुण्या इंग्लंडने टीम इंडियाचा हैदराबादमधील पहिल्या सामन्यात धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. इंग्लंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने खातं उघडलं. मात्र त्यानंतर टीम इंडियाने जोरदार मुसंडी मारली. टीम इंडियाने इंग्लंडचा दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात धुव्वा उडवला. टीम इंडियाने विशाखापट्टणमधील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून पहिल्या पराभवाचा वचपा घेत हिशोब बरोबर केला.
त्यानंतर राजकोटमध्ये तिसरा सामना पार पडला. टीम इंडियाने इंग्लंडवर चौथ्याच दिवशी विजय मिळवला. टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय मिळवला. टीम इंडियाने इंग्लंडवर 434 धावांनी मात केली. टीम इंडियाने यासह 2-1 अशी आघाडी घेतली. आता टीम इंडियाला चौथा सामना जिंकून सीरिज लॉक अर्थात जिंकण्याची संधी आहे. हा चौथा सामना कधी आणि कुठे होणार, किती वाजता सुरु होणार, हे सर्वकाही जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना हा 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना हा रांचीतील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉमप्लेक्समध्ये खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 9 वाजता टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येईल.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.
दरम्यान इंग्लंड क्रिकेट टीमने सामन्याच्या काही तासांआधी प्लेईंग ईलेव्हन जाहीर करत सज्ज असल्याची घोषणा केली आहे. इंग्लंडने चौथ्या सामन्यासाठी 2 बदल केले आहेत. मार्क वूड आणि लेग स्पिनर रेहान अहमद या दोघांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर फास्टर बॉलर ओली रॉबिन्सन आणि स्पिनर शोएब बशीर या दोघांची एन्ट्री झाली आहे.
टीम इंडिया विरुद्धच्या चौथ्या कसोटी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.
चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप