धर्मशाला | टीम इंडिया मायदेशात इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडियाने या 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने आघाडी घेत सीरिज जिंकली आहे. आता या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हा धर्मशालेत 7 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे. या पाचव्या सामन्यासाठी दोन्ही संघ धर्मशालेत पोहचले आहेत. या सामन्यासाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक आहे. अशात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
टीम इंडिया-इंग्लंड पाचव्या कसोटीआधी एक स्टार आणि आक्रमक फलंदाज धर्मशालेत दाखल झाला आहे. टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज आणि ज्युनिअर युवराज सिंह अर्थात रिंकू सिंह हा देखील धर्मशालेत पोहचला आहे. त्यामुळे आता इंग्लंड विरुद्ध रिंकू सिंह टीम इंडियासाठी धर्मशालेत कसोटी पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
रिंकू सिंहचा इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी संघात समावेश तर करण्यात आलेला नाही. त्यामुळे रिंकूच्या पदार्पणाच्या शक्यतेला काहीच अर्थ नाही. मात्र रिंकू सामना पाहण्यासाठी पोहचला असाव, असं म्हटलं जात आहे. रिंकूने आपण धर्मशालेत असल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. रिंकूने धर्मशालेत आयपीएल टीम केकेआरचा कोच आणि इंग्लंडचा विद्यमान प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम याची भेट घेतली.
रिंकू सिंह-ब्रँडन मॅक्युलम फोटो व्हायरल
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.
टेस्ट सीरजसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, डॅनियल लॉरेन्स आणि गेस ऍटकिन्सन.