मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील पाचव्या कसोटी सामन्यामध्ये एक डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये टीम इंडियाने 4-1 ने विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या संघाने गुडघे टेकवल्याचं पाहायला मिळालं. पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियाने इंग्लिश फलंदाजांना वरचढ होण्याची एकही संधी मिळू दिली नाही. सामना संपल्यावर कुलदीप यादवला ‘मॅन ऑफ द मॅच’ आणि यशस्वी जयस्वाल याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार देत गौरवण्यात आलं.
मी मालिका खरोखरच एन्जॉय केली असून प्रत्येक सामन्यामध्ये फलंदाजीचा आनंद घेतला. मी एकदा ठरवलं की, एखाद्या गोलंदाजाला टार्गेट करून त्याच्यावर आक्रमण करायचं तर मी माघार घेत नाही. एका वेळी गेम प्लॅन करतो आणि नेहमी संघासाठी कशा प्रकारे योगदान देऊ शकतो हाच विचार करतो. जेणेकरून संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. असं यशस्वी जयस्वाल याने म्हटलं आहे.
यशस्वी जयस्वाल याने या कसोटी मालिकेमध्ये 5 सामन्यात 712 धावा आणि दोन द्विशतके केलीत. भारत आणि इंग्लंडज कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. इंतकंच नाहीतर यशस्वी जयस्वाल याने सर्वात जलद 1000 कसोटी धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 16 डावांमध्ये यशस्वीने हा विक्रम केला असून तो दुसरा फलंदाज ठरला आहे. कमी डावात 1000 कसोटी धावा करण्याचा विक्रम विनोद कांबळी याच्या नावावर आहे.
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. सुनील गावसकर यांनी वेस्ट इंडिजविरूद्ध 774 धावा केल्या होत्या. दुसऱ्या स्थानी जयस्वाल असून त्याने 712 धावा केल्या आहेत. विराट कोहली याचाही विक्रम त्याने मोडला आहे. विराट कोहली याने 2015 साली 655 धावा केल्या होत्या. कोहलीचा विक्रम त्याने मोडला आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन स्टोक्स (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, शोएब बशीर, मार्क वुड, जेम्स अँडरसन