IND vs ENG | ‘ए भाऊ, हिरो नाही बनायचं इथं’, रोहित शर्माने भर मैदानात सर्फराज खानला का झापलं, पाहा Video

| Updated on: Feb 25, 2024 | 6:41 PM

Rohirt Sharma on Sarfaraz Khan : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील चौथ्या कसोटी सामन्यावर टीम इंडियाने पकड मिळवली आहे. या सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रोहित सर्फराज खान याला झापताना दिसत आहे.

IND vs ENG | ए भाऊ, हिरो नाही बनायचं इथं, रोहित शर्माने भर मैदानात सर्फराज खानला का झापलं, पाहा Video
Follow us on

मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये चौथा कसोटी सामना रांचीमध्ये सुरू आहे. टीम इंडियाने या सामन्यावर पकड मिळवली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर टीम इंडिया फलंदाजी करत असून जिंकण्यासाठी 152 धावांची गरज आहे. टीम इंडियाच्या स्पिनर्ससमोर हे इंग्लंडच्या खेळाडूंनी गुडघे टेकवल्याचं पाहायला मिळालं. इंग्लंड संघाचा दुसरा डाव अवघ्या 145 धावांवर आटोपला असून आता टीम इंडियाच्या दिवसाखेर 40-0 धावा आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल  झाला आहे. ज्यामध्ये रोहितने सर्फराज खान याला झापलं आहे.

नेमकं मैदानावर काय झालं?

इंग्लंडचा संघ फलंदाजी करत असताना टीम इंडियाने आक्रमक फिल्डिंग लावली होती. स्ट्राईकला असलेल्या खेळाडूच्या जवळ सर्फराज खान हा उभा होता. त्यावेळी त्याने हेल्मेट घातलं नव्हतं. त्यावेळी कॅप्टन रोहित शर्माने आपल्या स्टाईलमध्ये त्याला झापलेलं पाहायला मिळालं. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, रोहित सर्फराज खानला ऐ भाई हीरो नहीं बनने का इधर, असं बोलत आहे. त्यानंतर केस भरत सर्फराजला हेल्मेट देऊन गेला.

पाहा व्हिडीओ :-

 

रोहितने सर्फराज खान याला झापल्यावर कॉमेट्री करणाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण देताना रोहितच्या स्टाईलचं कौतुक केलं. क्रिकेटमध्ये बॉल लागल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. रोहितने मैदानावर एक कर्णधार म्हणून त्याचं उत्तम काम पार पाडलं. सोशल मीडियावर त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.