मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताने इंग्लंडचा वचपा काढला. नाणेफेकीचा कौल जिंकत इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फेल ठरला. भारतीय संघाला 229 धावांवर रोखलं खरं पण या धावांचा पाठलाग करणं कठीण झालं. इंग्लंडचा संपूर्ण संघ फक्त 129 धावा करू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने 4, जसप्रीत बुमराहने 3, कुलदीप यादवने 2 आणि रवींद्र जडेजाने एक गडी बाद केला. भारताने इंग्लंडला 100 धावांनी पराभूत केल्याने नेट रनरेटमध्ये जबरदस्त फरक पडला. तसेच 12 गुणांसह असून गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे.
वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ:-
रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने सलग सहावा विजय मिळवला आहे. इंग्लंडचा 100 धावांनी विजय मिळवला आहे.
आदिल राशीदच्या रुपाने इंग्लंडला नववा धक्का बसला. मोहम्मद शमीने त्याला त्रिफळाचीत करत तंबूचा रस्ता दाखवला.
कुलदीप यादवला दुसरं यश मिळालं आहे. लियाम लिविंगस्टोनला 27 धावांवर असताना बाद केलं आहे.
रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन शॉट मारणं ख्रिस वोक्सला महागात पडलं. वोक्स अवघ्या 10 धावा करून तंबूत परतला.
भारताने विजयासाठी दिलेल्या 230 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे 6 गडी स्वस्तात बाद झाले आहेत. त्यामुळे इंग्लंडवर दबाव वाढला आहे. तर शमीच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडची स्थिती एकदम वाईट झाली आहे.
इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. कुलदीप यादवने जोस बटरला बाद करत इंग्लंडवर दबाव वाढवला आहे.
चिपळूण : अमली पदार्थ कायद्यांतर्गत पोलिसांनी आतापर्यंत 7 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. चिपळूण तालुक्यात अल्पवयीन मुलांना अमली पदार्थ सेवन करताना स्थानिक नागरिकांनी पकडून दिले. त्यानंतर चिपळूण पोलीस स्टेशन अलर्ट मोडवर आले. या संदर्भात तपास यंत्रणा कामाला लागली असून पाच जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केलीय.
जसप्रीत बुमराहनंतर मोहम्मद शमीने इंग्लंडला धक्का दिला आहे. जॉनी बेयरस्टोला तंबूत पाठवत इंग्लंडवर दबाव वाढवला आहे.
मोहम्मद शमी याने इंग्लंडला तिसरा धक्का दिला आहे. बेन स्टोक्स याचा त्रिफळा उडवला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही.
जसप्रीत बुमराह याने इंग्लंडला सलग दोन धक्के दिले. डेविड मलाननंतर आलेल्या जो रूट शून्यावर बाद झाला.
टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून देण्यात जसप्रीत बुमराहला यश मिळालं आहे. आघाडीला आलेल्या डेविड मलान याला स्वस्तात तंबूत पाठवलं आहे.
टीम इंडियाने 9 गडी गमवून 229 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर विजयासाठी 230 धावांचं आव्हान दिलं आहे. ही खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी असल्याने या धावा गाठणंही कठीण होईल. आता टीम इंडियाचे गोलंदाज कशी गोलंदाजी करतात याकडे लक्ष लागून आहे. रोहित शर्मा, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव सोडले तर एकही फलंदाजी साजेशी कामगिरी करू शकला नाही.
सूर्यकुमार यादव 49 धावा करून तंबूत परतला आहे. त्यामुळे मोठ्या धावसंख्येची अपेक्षा मावळली आहे.
रवींद्र जडेजानंतर मोहम्मद शमी मैदानात उतरला. पण काही खास करू शकला नाही. अवघी एक धाव करून तंबूत परतला.
रवींद्र जडेजा 8 धावा करून बाद झाला. अदिलच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला.
रोहित शर्मा 87 धावा करून तंबूत परतला आहे. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्याचं सूर्यकुमार यादव आणि रवींद्र जडेजासमोर आव्हान आहे.
आता कुठे डाव सावरला असं वाटत असताचा के एल राहुल मोठा फटका मारण्याच्या नादात ३९ धावांवर आऊट झाला. भारताला चौथा झटका बसला असून आता मैदानात रोहित आणि सूर्यकुमार यादव खेळत आहेत.
रोहित शर्मा याने इंग्लंडविरूद्ध अर्धशतक केलं असुन संघाचा डाव सावरला आहे. रोहित आणि केएल राहुल आता मैदानात भाराताच्या डावाची धुरा सांभाळत आहेत.
भाराताला तिसरा झटका बसला असून श्रेयस अय्यर आऊट झाला आहे. भारतीय संघाच्या अडचणीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.
आता संघाची मदार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यावर असणार आहे. शुबमन गिल आणि विराट कोहली लवकर बाद झाल्याने संघ आता अडचणीत सापडला आहे.
भारताला दुसरा झटका बसला असून किंग विराट कोहली शून्यावर आऊट झाला आहे. डेव्हिड विलीने त्याला आऊट करत संघासाठी महत्त्वाचं यश मिळवलं आहे.
शुबमन गिल 9 धावांवर आऊट झाला असून संघाला पहिला झटका बसला आहे. ख्रिस वोक्स याने त्याला आऊट केलं आहे. मैदानात आता विराट कोहली आला आहे.
सामन्याला सुरूवात झाली असून कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल मैदानात उतरले आहेत. तर इंग्लंडकडून डेव्हिड विली पहिली ओव्हर टाकत आहे.
भारत आणि इंग्लंड संघाने आजच्या सामन्यात मागील सामन्यातील संघ आजच्या सामन्यात कायम ठेवला आहे. आर. अश्विन याला संघात जागा मिळणार याकडे बोललं जात होतं मात्र संघ व्यवस्थापनाने तोच संघ कायम ठेवला आहे.
इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथ म फलंदाजी करताना किती धावा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विराट कोहली आज लखनऊमध्ये ४९ व्या शतकाला गवसणी घालणार की नाही याकडे अवघ्या क्रिकेट जगताचंं लक्ष लागलं आहे. विराटा या शतकासह इतिहास रचणार आहे.