मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील भारत आणि इग्लंंडमध्ये आज सामना होणार आहे. गतविजेत्या इंग्लंड संघाला यंदा भारतामध्ये काही खास कामगिरी करता आली नाही. रोहित शर्मा झकास फॉर्ममध्ये असल्याचं आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये दिसलं आहे. आजचा सामना सन डे स्पेशल असणार आहे. भारताने आपलं सेमीफायनलमधील स्थान पक्क केलं आहे. तर इंग्लंड संघाचं जवळपास पॅकअप झाल्यात जमा आहे. दोन्ही संघांची हेड टू हेड कामगिरी पाहिली तर कोणाचं पारडं जड? जाणून घ्या.
वन डे मध्ये आतापर्यंत भारत आणी इंग्लंड 106 वेळा आमने सामने आले आहेत. यामधील भारताने 106 तर इंग्लंडने 44 सामन्यात विजय मिळवला आहे. दोन सामने टाय झाले असून 3 सामने अनिर्णित राहिले. भारत आणि इग्लंडमध्ये अनेक रोमांचक सामने झालेले पाहायला मिळाले आहेत. 2011 मधील वर्ल्ड कप सामना बरोबरीत सुटला होता.
वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड आठवेळा भिडले असून ही धक्कादायक आकडेवारी आहे. आठ सामन्यांमधील चार सामने इंग्लंड संघाने जिंकलेत तर भारताने तीन सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला होता. 1975 मध्ये वर्ल्ड कप इतिहासामधील भारत-इंग्लंड पहिला सामना 1974 साली झाला होता त्यावेळी इंग्लंड संघाने विजय मिळवलेला.
दरम्यान, भारत आतापर्यंतच्या स्पर्धेत अजिंक्य राहिला असून आजच्या सामन्यामध्ये विजय मिळवला तर वर्ल्ज कपमधील सहावा विजय ठरणार आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ दमदार कामगिरी करत आहे. इंग्लंड संघ आपली सर्व ताकद या सामन्यात लावताना दिसतील. कारण पाच सामन्यांपैकी अवघ्या एका सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे.
रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.