मुंबई : भारत आणि इंग्लंड (IND VS ENG T20) यांच्यातील पहिला T20 सामना साउथहॅम्प्टनच्या एजिस बाउल स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharama) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दीपक हुडा आणि ईशान किशन क्रीजवर टिकलेले दिसून आले. पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग टीम इंडियासाठी पदार्पण करत आहे. रोहित शर्माने त्याला टी-20 कॅप दिली. या T20 मालिकेत भारतीय संघ एजबॅस्टन कसोटी सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याचा पुरेपर प्रयत्न करताना दिसेल. बऱ्याच दिवसांनी या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे, जो कोरोना व्हायरसवर (Corona) मात करून मैदानात परतला आहे. रोहित शर्मा कोविड -19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एजबॅस्टन कसोटी सामन्यात सहभागी होऊ शकला नव्हता.
Congratulations to @arshdeepsinghh who is all set to make his T20I debut for #TeamIndia
He receives his cap from Captain @ImRo45#ENGvIND pic.twitter.com/2YOY15GwRj
— BCCI (@BCCI) July 7, 2022
रोहित शर्माच्या नेतृत्वात संघाने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या 11 टी-20 सामन्यांपैकी 7 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर इंग्लंडने केवळ 4 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या मागील तीन मालिकांबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाने तिन्ही मालिका जिंकल्या आहेत.
2021 मध्ये भारताने इंग्लंडचा 3-2 अशा फरकाने पराभव केला. त्याच वेळी, 2018 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली होती. यापूर्वी 2016-17 च्या भारत दौऱ्यात इंग्लंडला 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर येथेही भारताचाच वरचष्मा आहे. दोघांमध्ये आतापर्यंत 19 टी-20 सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने 10 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने 9 सामने जिंकले आहेत.
पहिल्या T20 सामन्यासाठी अनेक भारतीय खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. हे खेळाडू दुसऱ्या T20 पासून भारतीय संघाचा भाग असतील. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांना पहिल्या T20 साठी संघात स्थान मिळालेले नाही.