IND vs ENG | टीम इंडियाची इंग्लंड विरुद्धची कामगिरी, आकडे काय सांगतात?

| Updated on: Jan 22, 2024 | 10:15 PM

India vs England Head To Head Records | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाची ही टी 20 वर्ल्ड कप 2024 आधीची अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका आहे.

IND vs ENG | टीम इंडियाची इंग्लंड विरुद्धची कामगिरी, आकडे काय सांगतात?
Follow us on

मुंबई | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. उभयसंघात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाची कॅप्टन्सी करणार आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंडची धुरा देण्यात आली आहे. मालिकेतील पहिला सामना हा 25 जानेवारीपासून हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. या मालिकेनिमित्ताने या दोन्ही संघांचा कसोटी मालिकेतील रेकॉर्ड कसा आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हा 1932 साली खेळवण्यात आला होता. टीम इंडियाला त्यानंतर पहिल्या विजयासाठी तब्बल 3 दशक वाट पाहावी लागली. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध 1961/1962 साली विजय मिळवला होता. दोन्ही संघात अखेरची कसोटी मालिका ही 2021 साली झाली होती. तेव्हा 5 सामन्यांची मालिका ही 2-2 ने बरोबरीत राहिली होती. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 131 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये इंग्लंड टीम इंडियावर वरचढ राहिली आहे. इंग्लंडने 131 सामन्यांपैकी 50 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियाने 31 सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवला आहे.

50 सामने ड्रॉ

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 50 सामने हे अनिर्णित राहिले आहेत. टीम इंडियाने भारतात 22 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियाने इंग्लंडला इंग्लंडमध्ये 9 सामन्यात पराभूत केलंय. तर इंग्लंडने घरात 36 आणि भारतात 14 सामने जिंकले आहेत.

टेस्ट सीरिजसाठी इंग्लंड क्रिकेट टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टली, जॅक लीच, ऑली पोप, डॅन लॉरेन्स, रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.

पहिल्या 2 कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.