रांची | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. विराट कोहली याने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून पूर्णपणे माघार घेतली. त्यानंतर आर अश्विन हा तिसऱ्या कसोटी दरम्यान कौटुंबिक कारणामुळे अचानक टीमला सोडून निघून गेला होता. मात्र त्यानंतर तो परतलाही. विराट, आर अश्विन याच्यानंतर आता आणखी एक खेळाडू वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. हा खेळाडू टीम इंडिया विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातूनही बाहेर झाला आहे. त्यामुळे टीमला मोठा झटका लागला आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात रांचीत चौथा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या दरम्यान इंग्लंड क्रिकेट टीमला मोठा झटका लागला आहे. इंग्लंडचा स्पिनर रेहान अहमद याला इंग्लंडला परतावं लागलं आहे. इंग्लंड क्रिकेट टीमने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. रेहानला वैयक्तिक कारणामुळे मायदेशी परतावं लागत आहे.तो धर्मशालेत होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात ही खेळणार नाही, असं या ट्विटमध्ये म्हटलंय.
रेहान अहमद याच्या जागी टीममध्ये अद्याप कुणाचा समावेश करण्यात आलेला नाही. आता पाचव्या कसोटीआधी रेहानच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली जाते का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. दरम्यान चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्य डावात इंग्लंडच्या 353 धावांच्या प्रत्त्युतरात 307 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला 46 धावांची आघाडी मिळाली. आता इंग्लंडला स्वसतात रोखून झटपट गुंडाळण्याचं आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असणार आहे.
इंग्लंड क्रिकेट टीमला लागला मोठा झटका
Take care, @RehanAhmed__16 ❤️
Rehan Ahmed will return home for personal reasons.
He will not be returning to India and we will not be naming a replacement.
🇮🇳 #INDvENG 🏴 #EnglandCricket pic.twitter.com/T7SgSLYDhp
— England Cricket (@englandcricket) February 23, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.