मुंबई : आशिया कप 2023मधील पाचव्या सामन्यात ग्रुप ए मधील टीम इंडियाने धमाकेदार असा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने नेपाळचा 10 विकेट्सने एकतर्फी पराभव केला आहे. नेपाळने टीम इंडियाला 50 ओव्हरमध्ये 231 धावांच आव्हान दिलं होतं. मात्र पावसामुळे टीम इंडियाला डीएलएस नियमानुसार 23 ओव्हरमध्ये 145 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान टीम इंडियाच्या रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीनेच पूर्ण केलं. या दोघांनी 147 धावांची शतकी भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं केली. रोहित शर्मा याने नाबाद 74 आणि गिलने नाबाद 67 धावा केल्या. टीम इंडियाने या विजयासह सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. तर नेपाळचं पराभवामुळे आव्हान संपुष्टात आलं.
नेपाळ विरुद्धचा सामना भारताने 10 गडी राखून जिंकला आहे. यासह भारताने सुपर 4 मध्ये एन्ट्री मारली आहे. सुपर फोरमध्ये भारताचा सामना पुन्हा एका पाकिस्तानसोबत होणार आहे.
कर्णधार रोहित शर्मा याने नेपाळनं दिलेलं आव्हान गाठण्यासाठी आक्रमक सुरुवात केली आहे. सलग दोन षटकार ठोकत टीमवरचं प्रेशर कमी केलं आहे.
सुधारित टार्गेट गाठण्यासाठी रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली आहे. संदीप लामिचानेच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने चौकार आणि षटकार ठोकला.
भारत विरुद्ध नेपाळ सामन्यात पावसाच्या व्यत्ययानंतर निर्धारित षटकं कमी करण्यात आली आहेत. तसेच नवीन लक्ष्य टीम इंडियासमोर देण्यात आलं आहे. 23 षटकात भारताला 145 धावा करायच्या आहेत. तसेच पॉवर प्ले पाच षटकांचा देण्यात आला आहे. तीन बॉलर पाच ओव्हर टाकू शकतात. तर दोन बॉलर्सना चार षटकं टाकण्याची परवानगी असेल. डकवर्थ लुईस नियमानुसार हे टार्गेट सेट करण्यात आलं आहे.
पल्लेकेले | पावसानंतर खेळपट्टीची रात्री 10 वाजता पाहणी होणार आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे.
पल्लेकेले | टीम इंडिया 231 धावांच्या पाठलागासाठी मैदानात आली. रोहित शर्मा आणि शुबमन गिल ओपनिंग आले. 2.1 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. टीम इंडियाने बिनबाद 17 धावा केल्या. त्यानंतर पुन्हा पाऊस आला. पुन्हा खेळ थांबला.
पल्लेकेले | टीम इंडिया 231 धावांच्या पाठलागासाठी मैदानात आली आहे. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामी जोडी खेळत आहे. या सलामी जोडीकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा आहे.
पल्लेकेले | नेपाळ क्रिकेट टीमने टीम इंडियाला विजयासाठी 231 रन्सचं टार्गेट दिलंय. नेपाळने 48.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट 230 धावा केल्या. नेपाळकडून आसिफ शेख याने 58 आणि सोमपाल कामी याने 48 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज या दोघांनी सर्वाधिक 3-3 विकेट्स घेतल्या. टीम इंडिया आता नेपाळच्या बॉलिंगसमोर कशी खेळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पल्लेकेले | नेपाळने 43.3 ओव्हरमध्ये टीम इंडिया विरुद्ध 200 धावा पर्ण केल्या आहेत. नेपाळने चौथ्यांदा वनडे क्रिकेट इतिहासात ही कामगिरी केली आहे. नेपाळने याआधी झिंबाब्वे, वेस्टइंडिज आणि आयर्लंड विरुद्ध ही कामगिरी केली होती.
पल्लेकेले | नेपाळने सातवी विकेट गमावली आहे. दीपेंद्र सिंग आयरी 29 धावांवर एलबीडबल्यू आऊट झाला. टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या याने यासह विकेटचं खातं उघडलं.
पल्लेकेले | टीम इंडिया विरुद्ध नेपाळ सामन्याला पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. जवळपास संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी पावसाची एन्ट्री झाली. त्यानंतर थेट 6 वाजून 30 मिनिटांनी म्हणजेच पाऊण तासांनी सामन्याला सुरुवात झाली. मात्र सामन्यातील ओव्हर कमी करण्यात आलेल्या नाहीत.
पल्लेकेले | टीम इंडिया-नेपाळ विरुद्ध सामन्यात पावसाने एन्ट्री घेतलीय. त्यामुळे खेळ थांबला आहे. पीचवर कव्हर टाकण्यात आले आहेत. दोन्ही टीमचे खेळाडू मैदानाबाहेर गेले आहेत. नेपाळने 37.5 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 178 धावा केल्या आहेत.
पल्लेकेले | टीम इंडिया-नेपाळ सामन्यात पावसाने काही सेकंदासाठी एन्ट्री घेतली. त्यामुळे खेळ थांबवावा लागला. ग्राउंड्समॅन कव्हर घेऊन अर्ध्यापर्यंत आले. मात्र पाऊस थांबला. त्यामुळे पुन्हा खेळ सुरु झाला.
पल्लेकेले | टीम इंडियाने नेपाळला सहावा झटका दिला आहे, यासह मोहम्मद सिराजने दुसरी विकेट घेतली आहे. सिराजाने गुलशन झा याला आऊट केलंय. गुलशनने 23 रन्स केल्या.
पल्लेकेले | नेपाळला मोठा झटका लागला आहे. आसिफ शेख आऊट झाला आहे. आसिफने 97 बॉलमध्ये 58 धावांची खेळी केली.
पल्लेकेले | नेपाळच्या आसिफ शेख याने टीम इंडिया विरुद्ध अर्धशतक केलंय. आसिफच्या वनडे कारकीर्दीतील हे 11 वं अर्धशतक ठरलंय.
पल्लेकेले | नेपाळने चौथी विकेट गमावली आहे. तर रविंद्र जडेजा याने तिसरी विकेट घेतली आहे. जडेजाने कुशल मल्ला याला मोहम्मद सिराज याच्या हाती कॅच आऊट केलंय.
पल्लेकेले | रविंद्र जडेजा याने नेपाळला तिसरा झटका दिला आहे. जडेजाने सामन्यातील 20 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर कॅप्टन रोहित पौडेल याला कॅप्टन रोहित शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. पौडेलने 5 धावा केल्या.
तोडफोड फलंदाजी करणाऱ्या कुशल भुर्तेल याची विकेट शार्दुल ठाकूरने घेतली आहे. 25 चेंडूत त्याने 38 धावा केल्या असून त्यामध्ये त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले.
नेपाळने टीम इंडिया विरुद्ध जबरदस्त सुरुवात केली आहे. कुशल भुर्तेल आणि आसिफ शेख दोघांनी अर्धशतका सलामी भागदारी केली आहे. दोघांनीही टीम इंडियाच्या सर्व बॉलर्सचा घाम काढला.
नेपाळच्या खेळाडूने टीम इंडियाविरूद्ध 90 मीटरचा पहिला सिक्सर मारला. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर कुशल भुर्तेल याने हा सिक्सर मारला .
विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी दोन कॅच सोडल्यानंतर ईशान किशन यानेही एक सोपा कॅच सोडला आहे. ईशानने हा कॅच सोडल्यावर रोहित शर्मा त्याच्यावर भडकलेला दिसला,
टीम इंडियाचा लाईव्ह स्कोर 18-4
सामन्यातील पहिली ओव्हर मोहम्मद शमी याने टाकली. यामधील शेवटच्या चेंडूवर श्रेयस अय्यरकडून सुटला. त्यानंतर सिराजच्या पहिल्याच चेंडूवर विराटकडून कॅच सुटला.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
नेपाळ (प्लेइंग इलेव्हन): कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी, ललित राजबंशी
नेपाळविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माने आपला दुसरी हुकमी एक्का बाहेर काढला आहे.
जसप्रीत बुमराह याच्या जागी संघात कोणाला संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे. मोहम्मद शमी याची निवड होणार असल्याची माहिती समजत आहे. टीम व्यवस्थापन वेगळी काही निर्णय घेतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आजच्या सामन्यात पाऊस आला सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात येणार आहे. तसं झालं तर टीम इंडियाल फायदाच होणार आहे. कारण नेपाळ संघाचा पहिला सामन्यात पराभव झाला होता. त्यामुळे आजचा सामना रद्द जरी झाला. तर त्यांचा 1 गुणआणि टीम इंडियाचे दोन गुण होणार आहेत.