मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये आज 12 नोव्हेंबर रोजी साखळी फेरीतील शेवटचा सामना पार पडला. भारत विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात हा सामना झाला. टीम इंडियाने नेदरलँड्सवर 160 धावांनी मात करत सलग नववा विजय नोंदवला. टीम इंडियाने नेदरलँड्ससमोर 411 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर नेदरलँडस 250 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाच्या या विजयात प्रत्येकाने आपलं योगदान दिलं. आता टीम इंडिया 15 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध सेमी फायनलमध्ये भिडणार आहे.
बंगळुरु | कॅप्टन रोहित शर्माने तेजा निदामनुरु याला आऊट केलं. यासह नेदरलँड्स टीम 250 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाने अशाप्रकारे नेदरलँड्सवर 160 धावांनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाचा हा सलग नववा विजय ठरला.
बंगळुरु | कुलदीप यादव याने लोगान व्हॅन बीक याला क्लिन बोल्ड करत नेदरलँड्सला सातवा झटका दिलाय. कुलदीपची ही दुसरी विकेट ठरली.
बंगळुरु | विराट कोहली, शुबमन गिल याच्यानंतर आता सूर्यकुमार यादव बॉलिंग टाकायला आला आहे. सूर्यकुमार यादवने नेदरलँड्सच्या डावातील 33 वी ओव्हर टाकली.
बंगळुरु | जसप्रीत बुमराह याने परफेक्ट यॉर्कर टाकून नेदरलँड्सला पाचवा धक्का दिला. जसप्रीतने यासह पहिली विकेट घेतली. बुमराहने बास दी लीडे याला क्लिन बोल्ड केलं.
बंगळुरु | शुबमन गिल याने आपल्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्स विरुद्ध बॉलिंग टाकली आहे. शुबमनने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा दिल्या.
बंगळुरु | विराट कोहली याने वर्ल्ड कपमध्ये विकेट घेतली आहे. विराटने नेदरलँड्सच्या स्कॉट एडवर्ड्सला आऊट केलं.
बंगळुरु | रवींद्र जडेजा याने पहिली शिकार करत नेदरलँड्सला तिसरा झटका दिला आहे. जडेजाने मॅक्स ओडाऊड याला क्लिन बोल्ड केलं. मॅक्स ओडाऊड याने 30 धावा केल्या.
बंगळुरु | टीम इंडियाने नेदरलँड्सला दुसरा झटका दिला आहे. कुलदीप यादव याने कुलीन एकरमन याला आऊट केलं आहे.
मोहम्मद सिराजने पहिल्याच ओव्हरमध्ये संघाला विकेट मिळवून दिली आहे. वेस्ली बॅरेसी शून्यावर माघारी परतला आहे.
नेदरलंँड संघ बॅटींगसाठी मैदानात आला असून भारताच्या वेगवान गोलंदाजांपुढे त्यांचा निभाव लागतो की नाही हे पाहावं लागणार आहे. भारताकडे हुकमी एक्क्यासारखे गोलंदाज आहेत.
भारताने प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड संघाला 411 धावांचंं आव्हान दिलं आहे. के. एल. राहुलने नाबाद 102 धावा आणि श्रेयस अय्यरने नाबाद 128 धावा केल्या आहेत. वर्ल्ड कपमध्ये भारताने केलेली ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. याआधी 2007 साली बर्म्युडा संघाविरूद्ध भारताने 413 धावा केल्या होत्या.
47व्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने एकेरी धाव घेत शतक पूर्ण केले. वर्ल्ड कपमधील त्याचे हे पहिलेच शतक आहे. अय्यरने 84 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या यामध्ये त्याने ९ चौकार दोन षटकार मारले.
श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांनी 84 बॉलमध्ये १०२ धावांची शतकी भागीदारी करत संघाला 300 धावांचा टप्पा पार करून दिला आहे. भारत आता ४२ ओव्हरमध्ये ३०४ धावांवर खेळत असून मैदानाच अय्यर आणि राहुल आहेत.
भारताचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर याने अर्धशतक करत भारतीय संघाचा डाव सावरत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. वर्ल्ड कपमध्ये टॉप ऑर्डरच्या सर्व खेळाडूंनी अर्धशतक करण्याची पहिलीच वेळ आहे.
भारताचा स्टार खेळाडू किंग कोहली अर्धशतक करत आऊट झाला आहे. कोहलीने यंदाच्या वर्ल्ड कपमधील पाचवं अर्धशतक पूर्ण केलं असून सर्वाधिक धावा करण्यच्या यादीतही कोहलीने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.
सामन्यातील 25 ओव्हर संपल्या असून भारताने दोन विकेट गमावत 178 धावा केल्या आहेत. अय्यर आणि कोहली मैदानात आहेत.
बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावात गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने संतप्त ग्रामस्थाने गटारीच्या पाण्याने दिवाळीची अंघोळ केली. ऐन दिवाळीत गावातील गटारीचे पाण्याने अंघोळ करत प्रशासनाचा निषेध केलाय. गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने गावात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतापलेल्या गावकऱ्याने दुर्गंधीयुक्त गटारीच्या पाण्यात आंघोळ केलीय.
भारतीय संघाची दुसरी विकेट गेली, रोहितने 54 चेंडूत 61 धावांची खेळी केली. त्याने शुभमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केलेली. आता श्रेयस अय्यर फलंदाजीला आला आहे.
रोहित शर्माने या सामन्यात 44 चेंडूत चौकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. 14 षटक संपल्यानंतर भारतीय संघाने 1 गडी गमावून 109 धावा केल्या असून त्याच्यासोबत विराट कोहली खेळत आहे.
शुभमन गिल चांगली फलंदाजी करत होता आणि त्याने 32 चेंडूत 51 धावा केल्या, पण मीकरेनच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. गिल आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी झाली. तो बाद झाल्यानंतर विराट कोहली क्रीझवर आला आहे.
रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी नेदरलँडच्या संघाला फोडायला सुरूवात केली आहे. दोघांनीही कडक फटाके फोडले असून चौकार-षटकारांची बरसात पाहायला मिळत आहे.
रोहित शर्मा आणि शुबमन गिल मैदानात उतरले असून चौकार-षटकारांच्या आतषबाजी पाहायला मिळेल.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
नेदरलँड्स (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (C/W), बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन
रोहितने टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला असून आता भारतीय खेळाडू मैदानात फटाके खेळण्यासाठी तयार झाले आहेत.
वर्ल्ड कपमध्ये भारत आणि नेदरलँड आतापर्यंत दोनवेळा आमनेसामने आले आहेत. यामधील दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.
वर्ल्ड कपमधील साखळी फेरीतील भारत आणि नेदरलँड हा शेवटचा सामना आहे. तर शेवट गोड करण्यासाठी जाता-जाता दुसरा उलटफेर करण्याचा नेदरलंँड संघ पूर्ण ताकद लावेल.