IND vs NED Toss : भारताने जिंकला टॉस, रोहितने सेमी फायनलआधी खेळली मोठी चाल

| Updated on: Nov 12, 2023 | 2:07 PM

ind vs ned toss : भारत आणि नेदरलँड यांच्यातील सामन्यात रोहितने टॉस जिंकला आहे. आता भारतीय संघ दिवाळीचे फटाके फोडण्यासाठी तयार झाला आहे.

IND vs NED Toss : भारताने जिंकला टॉस, रोहितने सेमी फायनलआधी खेळली मोठी चाल
Follow us on

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि नेदरलँडमध्ये आजचा सामना होत आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना पार पडत आहे. आज भारताचे खेळाडू क्रिकेटच्या मैदानात फटाके खेळताना दिसतील. नेदरलँड संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत सर्वंना धक्का दिला होता. त्यामुळे भारतीय संघ जास्त हलक्यात घेणार नाही.

नेदरलँडविरूद्धचा सामना भारतासाठी रंगीत तालीम किंवा सराव सामन्यासारखा असणार आहे. सेमी-फायनलमध्ये भारत न्यूझीलंडसोबत भिडणार आहे. या सामन्याआधी तयारीसाठी रोहितने नेदरलँडविरूद्ध संघात कोणताही बदल केला नाही. या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी सेमी फायनल जिंकायचीच आहे त्यामुळे सर्व खेळाडूंसाठी एक सराव सत्र होईल.

2019 मध्ये भारतीय संघाला सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंड संघाने पराभूत केलं होतं. या सामन्याआधी साखळी सामन्यांमधील शेवटच्या नेदरलँडविरूद्धच्या सामन्यात संघाता रोहितने कोणताही बदल केला नाही. प्रत्येक खेळाडूने या स्पर्धेत आपलं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केलं आहे. हार्दिक पंड्या बाहेर गेल्यापासून रोहितने मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांना संघात स्थान दिलं आहे. त्यानंतर संघात कोणताही बदल केला नाही. 2019 चा बदला घेण्यासाठी भारतीय संघ पूर्ण तयीरीनिशी उतरेल.

दरम्यान, नेदरलँड संघ कोणती ना कोणती स्ट्रॅटेजी घेऊन मैदानात उतरेल. मात्र रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव यांच्यासमोर टिकाव लागतो का नाही हे पाहावं लागणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

नेदरलँड्स (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (C/W), बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन