भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना बंगळुरुत सुरु आहे. या सामन्यातील तीन दिवसांचा खेळ संपला असून अजून दोन दिवस शिल्लक आहे. या सामन्यावर तसं पाहिलं तर न्यूझीलंडची पकड मजबूत आहे. पण भारतीय फलंदाजांनी तिसऱ्या दिवशी चांगली खेळी केली. त्यामुळे चौथ्या दिवसावर भारताचं पुढचं गणित ठरणार आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि फसगत झाली. भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 46 धावांवर बाद झाला. त्यानंतर न्यूझीलंडने जबरदस्त खेळी करत भारतीय गोलंदाजांना जेरीस आणलं. न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्व गडी बाद 402 धावा केल्या. न्यूझीलंडकडे 356 धावांची मजबूत आघाडी होती. यासाठी भारताच्या सलामीच्या यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा या जोडीने चांगली सुरुवात केली. त्यानंतर विराट कोहली आणि सरफराज खान यांची जोडी जमली. या जोडीने 136 धावांची खेळी केली. विराट कोहलीने 70 धावा केल्या आणि दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर विकेट टाकली. तर सरफराज खान नाबाद 70 धावांवर खेळत आहे. भारताने 3 गडी गमवून 231 धावा केल्या आहेत. अजूनही न्यूझीलंडकडे 125 धावांची आघाडी आहे. असं असताना विराट कोहलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
विराट कोहलीने कसोटीत 9 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. विराट कोहलीने 197 कसोटी डावात 9 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांच्यानंतर असा कारनामा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. या यादीत विराट कोहली आघाडीवर आहे. कारण त्याने हा पल्ला गाठण्यासाठी 176 डाव घेतले. तर सचिनने 179 डावात ही किमया साधली. सुनील गावस्कर यांना 192 डाव लागले. विराट कोहलीने 9 हजारांचा पल्ला 197 डावात पूर्ण केला.
𝟗𝟎𝟎𝟎 𝐓𝐞𝐬𝐭 𝐫𝐮𝐧𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐨𝐮𝐧𝐭𝐢𝐧𝐠….
A career milestone for @imVkohli 👏👏
He is the fourth Indian batter to achieve this feat.#INDvNZ @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Bn9svKrgtl
— BCCI (@BCCI) October 18, 2024
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 2042 धावा केल्या आहेत. तसेच इंग्लंडविरुद्ध 1991 धावा आहेत. त्याचबरोबर दक्षिण अफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. दरम्यान कसोटीत सर्वात कमी डावात 9 हजार धावांचा पल्ला गाठण्याचा विक्रम कुमार संगकाराच्या नावावर आहे. त्याने 172 डावात ही किमया साधली आहे. स्टीव्ह स्मिथने 174 डावात, तर राहुल द्रविड आंतरराष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे, विराट कोहली आंतरराष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या स्थानी 15 हजार धावा करणारा पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी हा कारनामा पॉन्टिंग, संगकारा आणि केन विल्यमसनच्या नावावर आहे.