मुंबई | वर्ल्ड कप 2023 मधील 21 व्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने होते. टीम इंडिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आधीच्या चारही सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे टीम इंडिया-न्यूझीलंड सामना चंगला रगंतदार होण्याची शक्यता होती. त्यानुसार सामना रंगतदार झाला. मात्र टीम इंडियानेच आपली विजयी घोडदौड कायम राखत मिशन विजयी पंच यशस्वी केलं. टीम इंडियाने 274 धावांचं आव्हान हे 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं.
रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, कुलदीप यादव
केन विल्यमसन (C), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, विल यंग.
धर्मशाळा | टीम इंडियाने न्यूझीलंडवर 4 विकेट्सने मात करत वर्ल्ड कपमधील सलग पाचवा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने या विजयासह 20 वर्षांचा इतिहास बदलला आहे. टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये 20 वर्षांनंतर न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं 274 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 48 ओव्हरमध्ये 4 विकेट्स राखून पूर्ण केलं.
धर्मशाळा | टीम इंडियाला सहावा झटका लागला आहे. विराट कोहली 95 धावा करुन आऊट झाला आहे. मात्र विराटने न्यूझीलंड विरुद्ध विजयाचा मार्ग मोकळा केला आहे.
धर्मशाळा | चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार यादव 2 धावांवर रनआऊट झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती आता 5 बाद 191 अशी झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी आणखी 83 धावांची गरज आहे.
धर्मशाळा | टीम इंडियाला चौथा झटका लागला आहे. विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल एलबीडब्ल्यू आऊट झाला आहे. केएलने 35 बॉलमध्ये 27 धावांची खेळी केली.
धर्मशाळा | टीम इंडियाने चांगल्या सुरुवातीनतंर ठराविक अंतराने 3 विकेट्स गमावल्या. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल या जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला आहे. टीम इंडियाने 32 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 182 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी आणखी 92 धावांची गरज आहे.
धर्मशाळा | टीम इंडियाने तिसरी विकेट गमावली आहे. रोहित शर्मा, शुबमन गिलनंतर श्रेयस अय्यर 33 धावांवर कॅच आऊट झाला. श्रेयसनंतर केएल राहुल पाचव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला आहे.
धर्मशाळा | टीम इंडिया-न्यूझीलंड यांच्यातील खेळाला पुन्हा सुरुवात झाली आहे. धुक्यांमुळे काही वेळ खेळ थांबवण्यात आला होता.
धर्मशाळा | धुक्यांमुळे टीम इंडिया-न्यूझीलंड सामना थांबवण्यात आला आहे. टीम इंडियाने 274 धावांचा पाठलाग करताना 15.4 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 100 धावा केल्या आहेत.
धर्मशाळा | कॅप्टन रोहित शर्मा याच्यानंतर शुबमन गिल आऊट झाला आहे. शुबमन गिल मोठा फटका मारण्याच्या जाळात अडकला आणि कॅच आऊट झाला. शुबमनने 26 धावांची खेळी केली.
धर्मशाळा | टीम इंडियाने धमाकेदार सुरुवातीनंतर पहिली विकेट गमावली आहे. कॅप्टन रोहित शर्मा 46 धावांवर आऊट झाला. शुबमन आणि रोहित या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली.
धर्मशाळा | टीम इंडियाच्या रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने 274 धावांचा पाठलाग करताना शानदार सुरुवात केली आहे. सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आहे.
रोहित-शुबमन जोरात
Yet another cracking 5⃣0⃣-run opening stand!
Rohit Sharma 🤝 Shubman Gill
Follow the match ▶️ https://t.co/Ua4oDBM9rn#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvNZ pic.twitter.com/R31ufs7Mz4
— BCCI (@BCCI) October 22, 2023
धर्मशाळा | टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामी जोडी मैदानात आली आहे. न्यूझीलंडने टीम इंडियासमोर विजयासाठी 274 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्यामुळे शुबमन-रोहित जोडीवर टीम इंडियाला चांगली सुरुवात देण्याचं आव्हान असणार आहे.
धर्मशाळा | मोहम्मद शमी याने घेतलेल्या 5 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडला 273 धावांवर रोखलं आहे. न्यूझीलंडने पहिल्या 2 विकेट 19 धावांवर गमावल्या. मात्र त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी 157 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे न्यूझीलंडने टीम इंडियाला बॅक फुटवर ढकललं. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अखेरच्या काही ओव्हरमध्ये जोरदार कमबॅक करुन न्यूझीलंडचं 273 धावांवर पॅकअप केलं. त्यामुळे आता टीम इंडियाला सलग पाचव्या विजयासाठी 274 धावांचं आव्हान आहे.
हिंगोली येथील वसमत तालुक्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कुरुंदा ग्राम पंचायतीने घेतला पुढाऱ्यांना गाव बंदीचा ठराव. मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी. गावातील हाटकर ,धनगर, सह इतर सगळ्याच समाजाचा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा
धर्मशाळा | मोहम्मद शमी याने न्यूझीलंडला सलग 2 झटके दिले आहेत. शमीने मिचेल सँटनर आणि मॅट हॅनरी या दोघांना क्लिन बोल्ड केलं.
आक्रमक खेळाडू ग्लेन फिलिप्स मोठा फटका मारण्याच्या नादात २३ धावांवर कॅच आऊट झाला आहे. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने कमाल कॅच घेत पाचवा धक्का दिला.
भारताविरुद्ध डॅरिल मिशेलने शानदार शतक झळकावले. मिशेलचे हे विश्वचषकातील पहिले शतक आहे आणि एकदिवसीय कारकिर्दीतील पाचवे शतक आहे.
रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांची भागीदारी तोडली आहे. मोहम्मद शमी याने दुसरी विकेट घेत रचिन रवींद्र याला आऊट केलं आहे.
न्यूझीलंड संघाच्या 21 ओव्हरमध्ये 100 धावा पूर्ण झाल्या असून रचिन रविंद्र नाबाद ४० आणि डॅरिल मिशेल नाबाद ३८ धावांवर खेळत आहे.
न्यूझीलंडच्या 2 विकेट पडल्यानंतर, रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांनी न्यूझीलंडचा डाव सांभाळला. 14 ओव्हरनंतर स्कोअर 2 विकेट 56 धावा. रचिन 21 धावांवर तर मिशेल 14 धावांवर खेळत आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वर्ल्ड कपचा पहिला सामना खेळत आहे. पठ्ठ्याने पहिल्याच चेंडूवर विली यंग याला आऊट केलं आहे. शमीने वर्ल्ड कपमध्ये जोरदार कमबॅक केलं आहे.
मोहम्मद सिराज याने चौथ्या ओव्हरमध्येच भारतीय संघाला पहिली विकेट मिळवून दिली आहे. डेव्हॉन कानवे शून्य धावांवर आऊट झाला आहे श्रेयस अय्यर याने कमाल कॅच घेतला.
न्यूझीलंड संघाचे दोन्ही खेळाडू मैदानात उतरले असून भारताकडून जसप्रीत बुमराह पहिली ओव्हर टाकत आहे.
2019 साली वर्ल्ड कपमध्ये भारताचा सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंड संघाने पराभव केला होता. तेव्हाचा बदला घेण्यासाठी आता रोहित सेना सज्ज झाली आहे.
कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पंड्या याच्या जागी संघात सूर्यकुमार यादव याला संधी मिळाली आहे. त्यासोबतच संघात मोहम्मद शमी यालाही स्थान मिळालं आहे.
दुखापती हार्दिक पंड्याच्या जागी कोणाला संधी मिळते हे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सूर्यकुमार यादव की मोहम्मद शमी दोघांपैकी कोण प्लेइंग ११ मध्ये खेळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड संघाचे दोन्ही कर्णधार टॉससाठी मैदानात उतरले आहेत. टॉस का बॉस कोण हे काही मिनिटात समोर येईल.
मॅट हेन्री न्यूझीलंडसाठी गेम चेंजर ठरू शकतो. हेन्रीने गेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताविरुद्ध 3 विकेट घेतल्या होते. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघाची टॉप ऑर्डर कशा प्रकारे सामना करते पाहावं लागणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघांमध्ये 116 सामने झाले आहेत. यामधील भारताने 58 तर न्यूझीलंड संघाने 50 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर सात सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.