मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 21वा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. दोन्ही संघांची या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी राहिली आहे. त्यामुळे भारतासमोर न्यूझीलंडचं मोठं आव्हान असणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांनी स्पर्धेत सलग चार पैकी चार सामने जिंकले आहे. त्यामुळे गुणतालिकेत नंबर 1 साठी दोन्ही संघांची लढत होणार आहे. सध्या गुणतालिकेत न्यूझीलंड पहिल्या, तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. या सामन्यातील विजयी संघाला पहिलं स्थान मिळणार आहे. दुसरीकडे, वनडे वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ कायम भारताला डोकेदुखी ठरला आहे. मागच्या 20 वर्षात न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळालेला नाही. भारताने न्यूझीलंड विरुद्ध शेवटचा 2003 मध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे न्यूझीलंडला पराभूत करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. इतकंच काय तर 2019 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडमुळेच गाशा गुंडाळावा लागला होता.
भारत विरूद्ध न्यूझीलंड सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं वेगळ्या कारणासाठीही लक्ष लागून आहे. कोणते खेळाडू नशिबाचं दार उघडतील यासाठी आकडेमोड करत आहेत. मागच्या चार सामन्यांचा अंदाज बांधून खेळाडूंची निवड करणं सोपं होऊ शकतं. पण ऐनवेळी ते खेळाडू कामगिरी करतील की याबाबतही शंका आहे.
धर्मशाळेतील मैदान फलंदाजीसाठी चांगलं आहे. नव्या चेंडूसह गोलंदाजांना काही अंशी चांगला सीम मिळू शकतो. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर टीम पहिल्यांदा गोलंदाजी करणं पसंत करेल. कारण दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करणं सोपं होईल.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार),शुबमन गिल,विराट कोहली,श्रेयस अय्यर,केएल राहुल (विकेटकीपर),रविंद्र जडेजा,कुलदीप यादव,मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
न्यूजीलँड : डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रविंद्र, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, मिशेल सेंटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन,ट्रेंट बोल्ट.