मुंबई :टीम इंडियाने वनडे वर्ल्डकप 2023 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाने वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. दोन वेळा विजय, तर एकदा पराभवाचं तोंड पाहिलं आहे. अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यापैकी विजयी संघाशी होईल. उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. भारताने न्यूझीलंडसमोर विजयसाठी 398 धावांचं आव्हान दिलं होतं. पण न्यूझीलंडचा संघ 327 धावा करू शकला. अंतिम फेरीचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे.
भारताने न्यूझीलंडचा धावांनी धुव्वा उडवला आहे. भारताने 50 षटकात 397 धावा केल्या आणि न्यूझीलंडसमोर विजयासाठी 398 धावांचं आव्हान ठेवलं होतं. न्यूझीलंडचा संघ 327 धावा करू शकला. डेरिल मिचेलची शतकी खेळी करत टीम इंडियाला विजायासाठी चांगलंच झुंजवलं.
मोहम्मद शमीने न्यूझीलंडला नववा धक्का दिला आहे. तसेच वैयक्तिक सहावा गडी बाद केला आहे.
न्यूझीलंडला मिचेल सँटनरच्या रुपाने आठवा धक्का बसला आहे. सिराजच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने झेल घेतला.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मोहम्मद शमी जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. डेरिल मिचेलच्या रुपाने त्याने वैयक्तिक पाचवा धक्का दिला. मिचेल टीम इंडियाच्या विजयात अडसर ठरला होता.
न्यूझीलंडला सहावा धक्का बसला आहे. कुलदीप यादवने चॅपमॅनला तंबूचा रस्ता दाखवला आहे.
ग्लेन फिलिप्सच्या रुपाने न्यूझीलंडला पाचवा धक्का बसला आहे. जसप्रीत बुमराहला पहिलं यश मिळालं आहे. रवींद्र जडेजाने बॉण्ड्रीवर झेल पकडला.
डेरिल मिचेलने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच दम काढला आहे. डेरिल मिचेल खऱ्या अर्थाने ग्लेन मॅक्सवेलच्या भूमिकेत आला आहे. त्यामुळे रोहित शर्माचं टेन्शन वाढलं आहे. त्याला रोखण्याचं मोठं आव्हान आहे.
मोहम्मद शमीने न्यूझीलंडला चौथा धक्का दिला आहे. लॅथमला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे न्यूझीलंड पुन्हा एकदा बॅकफूटवर गेली आहे.
न्यूझीलंडला केन विल्यमसनच्या रुपाने तिसरा धक्का बसला आहे. केन विल्यमसन 69 धावा करून बाद झाला आहे. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर अप्रतिम झेल घेतला.
केन विल्यमसनचा सोपा झेल सोडल्याने भारतीय संघ अडचणीत आला आहे. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर केन विल्यमसनचा सोपा झेल शमीच्या हाती आला होता. पण त्याला तो झेल पकडण्यात अपयश आलं.
केन विल्यमसन आणि मिचेल यांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच दमछाक केली आहे. तिसऱ्या गड्यासाठी 100 धावांची भागीदारी केली आहे.
मुंबई | विकेटकीपर केएल राहुल याच्याकडून झालेल्या एका चुकीमुळे न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमसन याला जीवनदार मिळालं आहे. केएलच्या चुकीमुळे रनआऊट झालेला केन नॉट आऊट ठरला. नक्की काय झालं पाहा व्हीडिओत.
मुंबई | टीम इंडियाने ठराविक अंतराने 2 झटके दिल्यानंतर न्यूझीलंडचा डाव सावरला आहे. न्यूझीलंडने 100 धावा पूर्ण केल्या आहेत. तसेच केन विलियमसन आणि डॅरेल मिचेल या जोडीने न्यूझीलंडचा डाव सावरला आहे.
मुंबई | मोहम्मद शमीने न्यूझीलंडला दुसरा झटका दिला आहे. शमीने डेव्हॉन कॉनव्हेनंतर रचिन रवींद्र याला आऊट केलं आहे.
मुंबई | मोहम्मह शमी याने आपल्या पहिल्याच ओव्हरमधील पहिल्या बॉलवर न्यूझीलंडला पहिला झटका दिला. आहे. शमीने डेव्हॉन कॉनव्हे याला केएल राहुल याच्या हाती कॅच आऊट केलं. कॉनव्हेने 13 धावा केल्या.
मुंबई | न्यूझीलंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनव्हे ही सलामी जोडी मैदानात आली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 398 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
मुंबई | टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर सेमी फायनलमध्ये विजयासाठी 398 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 397 धावा केल्या. टीम इंडियाकडून विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. विराटने 117 आणि श्रेयसने 105 धावांची खेळी केली.
आपल्या वैयक्तिक 50 व्या शतकाला गवसणी घालत विराट कोहली आऊट झाला आहे. कोहली 117 धावांवर आऊट झाला, या खेळीमध्ये त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. कोहलीनंतर आता मैदानात के. एल. राहुल आला आहे.
विराट कोहली याने न्यूझीलंडविरूद्ध शतक करत आपल्या 50 शतकाला गवसणी घातली आहे. कोहलीने सचिनचा 49 शतकांचा विक्रम मोडला आहे.
40 व्या ओव्हरमध्ये श्रेयस अय्यर याने फर्ग्युसनला चौकार मारत शतकाच्या दिशेने आपली वाटचाल केली आहे. कोहली 95 तर अय्यर 60 धावांवर खेळत आहे.
विराट कोहली याच्या पायाला क्रॅम्प आल्याने खेळ काही काळ थांबवण्यात आला आहे. काहीवेळात सामना सुरू होईल.
श्रेयस अय्यर याने अवघ्या 35 बॉलमध्ये 50 धावा केल्या पासून लगातार चारवेळा त्याने 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या खेळीमध्ये त्याने दोन चौकार आणि चार षटकार मारले.
विराट आणि श्रेयस यांच्यात 100 धावांची भागीदारी झाली आहे. दोघांनी 50, 50 धावा केल्या असून भारत आता आणखी मजबूत स्थितीत गेला आहे.
एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडूमध्ये ठरला आहे. 674 धावा करत तो आता नाबाद असून विराटने सचिनचा सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड मोडला आहे.
विराट कोहलीने आपलं वर्ल्ड कपधील सहावं अर्धशतक पूर्ण केलं आहे. 59 बॉलमध्ये विराटने 50 धावा केल्या असून वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक अर्धशतके करण्याच्या यादीत त्याने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.
23 व्या ओव्हरमध्ये शुबमन गिल 79 धावांवर माघारी परतला आहे. त्याच्या जागी मैदाना श्रेयस अय्यर उतरला असून आता विराट आणि श्रेयस मैदाना आहे.
शुबमन गिल याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं असून मैदानात टिकून आहे. गिलचं हे वर्ल्ड कपमधील चौथं अर्धशतक आहे. 40 बॉलमध्ये त्याने आपलं अर्धशतक केलं आहे. यामध्ये त्याने 7 चौकार आणि 1 सिक्सर मारला.
रोहित शर्माच्या विकेटनंतर शुबमन गिलने आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे. तर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनीही धावांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला आहे.
रोहित शर्मा आऊट झाला असून भारताला पहिला झटका बसला आहे. 29 बॉलमध्ये 44 धावा रोहितने केल्या होत्या. साऊथीला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो कॅच आऊट झाला. केन विलियमसन याने कडक कॅच घेतला.
रोहितने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सिक्सर मारण्याच्या यादीमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. रोहितने सर्वाधिक 26 सिक्सर मारले आहेत. वन डे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचाही विक्रम रोहितने आपल्या नावावर केला आहे. रोहितने 50 सिक्सर मारले आहेत.
रोहित शर्मा याने पहिल्या ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्ट याला दोन चौकार मारत एक दमदार सुरूवात करून दिली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा काढल्या आहेत.
दोन्ही देशाचं राष्ट्रगीत झालं असून आता मैदानात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल उतरले आहेत. तर न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट पहिली ओव्हर टाकत आहे.
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (C), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (डब्ल्यू), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
भारतीय संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय फलंदाज पहिल्यांदा बॅटींग करत किती धावा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना सुरू होण्यापूर्वीच वानखेडेची खेळपट्टी चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे तो अहवाल ज्यामध्ये भारतीय संघ व्यवस्थापनाच्या सांगण्यावरून खेळपट्टीचे स्वरूप बदलण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्यातून गवत काढून त्याची गती संथ करण्यात आली आहे.
विराट कोहलीने आजच्या सामन्यात शतक ठोकलं तर वन डे मधील सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड तो आपल्या नावावर करणार आहे. विराटने 49 शतक करत सचिनच्या विक्रमासोबत बरोबरी केली आहे.
आजच्या सामन्याला सुपरस्टार रजनीकांत, अभिनेता आमिर खान, सलमान खान आणि नीता अंबानी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत दोन्ही संघ 9 वेळा आमने सामने आले आहेत. यामधील भारताने 4 तर न्यूझीलंडने 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.