IND vs NZ : टीम इंडियासाठी न्यूझीलंडचा हा खेळाडू कर्दनकाळच, 2019 च्या पराभवाचा मुख्य सुत्रधार!

| Updated on: Oct 22, 2023 | 9:02 AM

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड आज एकमेकांना भिडणार आहे. दोन्ही संघ वर्ल्ड कपमध्ये अपराजित असून आज कोणत्या तरी एका संघाचा विजयरथ थांबेल. आजच्या सामन्यात न्यूझीलंड संघ आपलं खास ब्रम्हास्त्र तयार ठेवेल. गडी एकटा भारतीय संघावर भारी पडला होता.

IND vs NZ : टीम इंडियासाठी न्यूझीलंडचा हा खेळाडू कर्दनकाळच, 2019 च्या पराभवाचा मुख्य सुत्रधार!
Follow us on

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील 21 वा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडणार आहे. आजचा सामना सुपर सनडे असणार असून भारतीय संघाची गडी सुसाट आहे. मात्र न्यूझीलंडसुद्धा संघ काही कमी नाही, किंवींनीही या वर्ल्ड कपमध्ये एकही सामना गमावला नाही. आज कोणत्याही एका संघाच्या विजयरथला ब्रेक लागणार आहे. भारतीय संघाची टॉप ऑर्डर मजबूत फॉर्ममध्ये आहे, मात्र न्यूझीलंडचा एक खेळाडू भारतासाठी घातक ठरू शकतो.

कोण आहे तो खेळाडू?

कर्णधार रोहित शर्मा मैदानात उतरल्यापासूनच हातात दांडपट्टा घेतल्यासारखा फलंदाजी करत आहे. रोहितच्या फटकेबाजीमुळे इतर फलंदाजांवरचा दबाव कमी होतो. ते खेळाडू कोणताही दबाव न घेता फलंदाजी करतात त्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणं आणखं सोपं होतं. परंतु जर रोहित शर्मा जर लवकर बाद झाला तर काही वेगळी गणित दिसू शकतं.  रोहितला लवकर आऊट करण्यासाठी न्यूझीलंड आपलं ब्रह्मास्त्र काढायला उशिर करणार नाही. कारण त्यांनाही माहित आहे की रोहित एकदा मैदानावर सेट झाला की तो संपूर्ण सामनाच सेट करून जातो.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून ट्रेंट बोल्ट आहे. बोल्टने वर्ल्ड कप 2019 मध्ये भारतीय संघाला मोठे धक्के दिले होते. बोल्टच्या घातक स्पेलने टॉप ऑर्डर उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे आजच्या सामन्यत सुरूवातीला रोहितने बचावात्मक पवित्रा घ्यायला हवा. ट्रेंट बोल्ट आयपीएलमध्ये खेळत असल्याने त्याला भारतीय परिस्थितीमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे.

दरम्यान, आजच्या सामन्यात हार्दिक पंड्या याच्या जागी कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हार्दिकला बांगलादेशविरूद्धच्या सामन्यामध्ये दुखापत झाली होती, त्यावेळी त्याला मैदान सोडावं लागलं होतं. सूर्यकुमार यादव की मोहम्मद शमी यांच्यातील कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ:-

रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, कुलदीप यादव