INDvsPAK : याला बोलतात दहशत, सामन्याआधी पत्रकार परिषदेत विराट कोहलीचं नाव घेत बाबर आझम म्हणाला…

| Updated on: Sep 02, 2023 | 8:30 AM

india vs pakistan asia cup 2023 : आशिया कपमधील तिसरा सामना टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये पार पडणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने पत्रकार परिषद घेत विराटबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

INDvsPAK : याला बोलतात दहशत, सामन्याआधी पत्रकार परिषदेत विराट कोहलीचं नाव घेत बाबर आझम म्हणाला...
Follow us on

 मुंबई :  आशिया कप 2023मधील टीम इंंडिया आणि पाकिस्तानध्ये तिसरा सामना ((INDIAvsPAK ASIA CUP 2023) होणार आहे. या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेलं असणार आहे. या सामन्याच्या 19 तास आधीच पाकिस्तान संघाने प्लेइंग 11 जाहीर (PAKISTAN TEAM PLAYING 11) केलीये. आजच्या सामन्यात विराट कोहलीकडे (VIRAT KOHLI) सर्वाचं जास्त लक्ष असणार आहे. विराट कोहली नेहमी पाकिस्तान संघावर भारी पडला आहे. सामन्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (BABAR AZAM) याने आपली प्रतिक्रिया दिलीये.

बाबर आझम आणि विराट कोहली यांची कायम तुलना केली जाते. दोघांमधील तुलना करताना कधी आकडेवारी तर कधी कव्हर ड्राईव्हसारखे दोघांचे कडक शॉट्सबाबत बोललं जातं. बाबरने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये, आम्ही येथे जुलै महिन्यापासून क्रिकेट खेळत आहोत. कसोटी आणि लीग सामने खेळलो असल्याने या अनुभवाचा आम्हीला नक्कीच फायदा होईल, असं बाबर आझम म्हणाला. यासोबतच यावेळी बोलताना त्याने विराटबाबतही मोठं वक्तव्य केलं.

काय म्हणाला बाबर आझम?

मी विराट कोहलीचा आदर करतो तो माझ्यापेक्षा मोठा असून नेहमी मी त्याचा आदर करत आलो आहे. जेव्हा मी खेळायला सुरूवात केली होती तेव्हा त्याच्याकडून काही सल्ले घेतले होते त्याची मला खूप मदत झाली होती. बाहरचे लोक आमच्याबद्दल काय बोलतात याबद्दल मला काही माहिती नाही ते त्यांच्यावरच सोडून द्या, असं बाबर आझमने म्हटलं आहे.

बाबर आझम याने सांगितल्याप्रमाणे पाकिस्तान संघाने टेस्ट सीरीज, लंका प्रीमिअर लीग आणि अफगाणिस्तानविरूद्ध तीन वन डे सामने खेळले आहेत. त्यामुळे पाकिस्तान संघाला याचा फायदा नक्कीच होणार आहे. लंका प्रीमिअर लीगमध्ये कर्णधार बाबर आझमने शतकही केलं होतं.

आजच्या सामन्यासाठी पाकिस्तान संघ | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हॅरिस रऊफ.