मुंबई : आशिया कपमधील भारत-पाक सामन्याला काही तास बाकी आहेत. या सामन्यावर पावसाचं मोठं संकट आहे. याआधीचाही सामना पावसामुळे रद्द झालेला. रविवारी म्हणजे आज होणाऱ्या सामन्यादिवशीही कोलंबोमध्ये पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे भारत-पाक सामन्याला सोमवार राखीव दिवस ठेवला गेला आहे. मागील सामन्यातील हिशोब पूर्ण करायचा असून हवामानाचीही तशी इच्छा दिसत आहे. भारत-पाक सामन्याआधी कोलंबोमधील वातावरण एकदम नॉर्मल असून ऊन पडलं आहे.
टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू आर. अश्विन याने एक फोटो शेअर करत हवामानाची माहिती दिली आहे. फोटो पाहता आजचा सामन्यावरल पावसाचं सावट असेल मात्र संपूर्ण सामना आज होऊ शकतो असं दिसत आहे. परंतु शेवटी हवामान आहे, कधी बदलेल काही सांगता येत नाही. आर. अश्विन याने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
आज जर सामना होऊ शकला नाहीतर उद्यासाठी एक दिवस राखून ठेवला आहे. त्यामुळे आज जरी एक इनिंग झाल्यावर पाऊस आला तर दुसरी इनिंग सोमवारी होऊ शकते. पाकिस्तान संघाने आजच्या संघासाठी प्लेइंग 11 जाहीर केली आहे. बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), फहीम अशरफ, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रीदी आणि हॅरिस रॉफ.
टीम इंडिया संभाव्य प्लेइंग 11 : पाकिस्तानविरुद्ध भारताचे संभाव्य प्लेइंग-11: रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल/इशान किशन (K), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी/मोहम्मद सिराज.