मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील सामना सुरू झाला आहे. आताच टॉस झाला असून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने टॉस जिंकत प्रथम बॉलिंदगचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मालाही टॉस जिंकत प्रथम बॅटींग करायची होती. या हाय व्होल्टेज सामन्यामध्ये टीम इंडियाने प्लेइंग 11 मध्ये दोन मोठे बदल केले आहेत. एका मुंबईकराला संधी देत दुसऱ्याला बाहेर बसावं लागलं आहे. रोहितने हा निर्णय घेताना एक वेगळं कारण समोर आलं आहे.
संघात मोठे बदल झाले असून यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याने संघात कमबॅक केलं आहे. मोहम्मद सिराजच्या जागी त्याला संघात स्थान मिळालं आहे. तर दुसरा मोठा बदल म्हणजे के. एल. राहुल याचीसुद्धा संघाता एन्ट्री झाली आहे. राहुलला श्रेयसच्या जागी संघात जागा मिळाली आहे. मागील सामन्यामध्ये ईशान किशन याने केलेली दमदार खेळीमुळे त्याला संघात कायम ठेवण्यात आलं आहे.
नेपाळविरूद्धच्या सामन्यामध्ये टीममध्ये जसप्रीत बुमराह प्लेइंग 11 मध्ये दिसला नाही. तो घरी गेला होता त्याच्या जागी संघात मोहम्मद शमीला स्थान मिळालं होतं. मात्र आता बुमराह परतल्याने संघात त्याला संघातून डच्चू देण्यात आला आहे. आता मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूर हे वेगवान गोलंदाज असणार आहेत.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रॉफ