अहमदाबाद | वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. टीम इंडिया पाकिस्तान विरुद्धचा वर्ल्ड कप इतिहासातील आठवा आणि यंदाच्या विश्व चषकातील सलग तिसरा विजय ठरला आहे. पाकिस्तानकडून टीम इंडियाला विजयासाठी 192 धावांचं आव्हान मिळालं होतं. टीम इंडियाने हे आव्हान कॅप्टन रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर सहज पूर्ण केलं. रोहितने 86 धावा केल्या. तर श्रेयसने 53 धावांची नाबाद खेळी केली. विराट आणि शुबमन या दोघांनी प्रत्येकी 16 धावांचं योगदान दिलं. तर केएल 19 धावा करुन नाबाद राहिला.
अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ
रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
अहमदाबाद | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील पाकिस्तान विरुद्धची विजयी घोडदौड कायम राखली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानचा 7 विकेट्सने विजय मिळवत 13 व्या वर्ल्ड कपमधील सलग तिसरा विजय मिळवला आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 192 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 3 विकेट्स गमावून 30.3 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली.
अहमदाबाद | टीम इंडियाने तिसरी विकेट गमावली आहे. कॅप्टन रोहित शर्मा आऊट झाला आहे. रोहित 63 बॉलमध्ये 86 धावा करुन आऊट झाला आहे. रोहितला वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग दुसरं शतक करण्याची संधी होती. मात्र रोहितची संधी अवघ्या 14 धावांनी हुकली.
अहमदाबाद | टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. विराट कोहली 16 धावा करुन कॅच आऊट झाला. हसन अली याने वराट कोहलीला आऊट केलं.
अहमदाबाद | शाहिन अफ्रीदी याने टीम इंडियाला पहिला धक्का दिलाय. शाहिनने शुबमन गिल याला 16 धावांवर कॅच आऊट केलं आहे.
अहमदाबाद | टीम इंडियाच्या रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने 192 धावांचा पाठलाग करताना दणक्यात सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पहिल्या 2 ओव्हरमध्ये 22 धावा केल्या आहेत. शुबमन 16 आणि रोहितने 5 धावा केल्या आहेत.
अहमदाबाद | टीम इंडियाने पाकिस्ताचं काम तमाम केलं आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला 42.5 ओव्हरमध्ये 191 धावांवर ऑलआऊट केलं आहे. त्यामुळे टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध आठवा विजय मिळवण्यासाठी 192 धावांची गरज आहे. पाकिस्तानकडून बाबर आझम याने सर्वाधिक 50 धावा केल्या. तर मोहम्मद रिझवान 49 धावांवर आऊट झाला. इमाम उल हक याने 36 आणि अबदुल्ल्हा शफीक याने 20 धावांचं योगदान दिलं. हसन अली 12 धावा करुन आऊट झाला. या व्यतिरिक्त टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या एकालाही दुहेरी आकडा गाठून दिला नाही. टीम इंडियाकडून कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह या पाचही जणांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
पाकिस्तान संघ पूर्णपणे बॅकफूटला फेकला गेलाय, कुलदीप यादव याने दोन विकेट घेतल्या होत्या त्यानंतर जसप्रीत बुमराह याने मोहम्मद रिझवान ४९ आणि शादाब खान याला आल्या आल्या माघारी पाठवलं. ऑल आऊट व्हायला फक्त तीन विकेट बाकी आहेत.
चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या आहेत. सौद शकील याला पायचीत ६ धावा आणि इफ्तिखार अहमद ४ धावांवर बोल्ड करत संघाला यश मिळवून दिलं. पाकिस्तान संघाच्या आता 167-5 स्कोर आहे.
बाबर आझम अर्धशतक झळकावल्यानंतर लगेचच बाद झाला. 29व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बाबरने अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर पुढच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तो बाद झाला. बाबरला सिराजचा चेंडू चुकला आणि तो बोल्ड झाला.
पाकिस्तानने 25 षटकांत 2 बाद 125 धावा केल्या आहेत. 25 षटकांचा खेळ बाकी आहे. बाबर आझम 35 धावांवर तर मोहम्मद रिवजान 33 धावांवर खेळत आहे. दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत 52 धावांची नाबाद भागीदारी केली आहे.
पाकिस्तान संघाला दुसरा झटका बसला असून हार्दिक पंड्या याने भारतीय संघाला यश मिळवून दिलं आहे. 38 धावांवर इमाम उल हक माघारी परतला आहे. के. एल. राहुल याने अप्रतिम कॅच पकडत संघासाठी महत्त्वाचं योगदान दिलं.
पाकिस्तान संघाचा सलामीवीर अब्दुल्ला शफीक याला मोहम्मद सिराज याने 20 धावांवर माघारी पाठवलं. इमाम आणि अब्दुल्लाने दमदार सुरूवात केली होती. खास करून सिराज यालाच जास्त धावा चोपल्या होत्या मात्र त्यानेच भारतीय संघाला पहिलं यश मिळवून दिलं आहे.
अहमदाबाद | टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सुरूवात झाली आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. पाकिस्तानकडून अब्दुल्लाह शफीक आणि इमाम उल हक ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे.
पाकिस्तानची प्लेइंग XI: बाबर आजम (कॅप्टन) अब्दुल्लाह शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिजवान, साउद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन शाह अफरीदी, हारिस रौफ.
भारत की प्लेइंग XI : रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर
थोड्याचवेळात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु होणार आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या मॅचसाठी इशान किशनला बाहेर बसवलं असून शुभमन गिलची टीममध्ये एन्ट्री झाली आहे.
सेलिब्रिटी सुद्धा क्रिकेट फॉलो करतात. भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल त्यांना सुद्धा प्रचंड कुतूहल असतं. कुठले सेलिब्रिटी येणार? जाणून घ्या….
भारत आणिपाकिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तर फुकटात डीडी स्पोर्ट्सवर पाहायला मिळणार आहे. मोबाईलवर फुकटात डिज्नी प्लस हॉटस्टार अॅपवर पाहायला मिळेल.
आजच्या सामन्यामध्ये पावसाने हजेरी लावली आणि सामना रद्द झाला तर कोणताही राखीव दिवस ठेवलेला नाही. आजचा सामना पावसाने वाहून गेलाच तर दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात येणार आहे.
वन डे वर्ल्ड कपचा रेकॉर्ड पाहिला तर आतापर्यंत भारत-पाक सातवेळा एकमेकांना भिडले आहेत. भारतीय संघाने यामधील सातपैकी सात सामने जिंकलेत. आता रोहित अँड कंपनी आठवा सामना जिंकण्यासाठी सज्ज आहे.
भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 134 वेळा आमने सामने आले असून यामध्ये पाकिस्तान संघ वरचढ राहिला आहे. पाकिस्तानने 73 तर भारताने 53 विजय मिळवलेत. तर 5 सामन्यांचा निकाल लागला नाही.
आज सर्वपित्री अमावस्या आहे. नाशिकच्या रामकुंडावर हजारो भाविक दाखल झाले आहेत. आजच्या दिवशी तीर्थ स्नानाचे हिंदू धर्म शास्त्रात महत्व आहे. ज्ञात -अज्ञात पितरांना आज दिले जाते तर्पण… रामकुंडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आहे.