मुंबई : वर्ल्ड कप 2023मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये टॉस जिंकत रोहित शर्मा याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सामन्याच्या सुरूवातीला पाकिस्तानचे सलामीवीर इमाम उल हक आणि अब्दुला शफीक उतरले होते. दोघांनीही संघाला दमदार सुरूवात केली मात्र मोहम्मद सिराज याने ही जोडी फोडत संघाला यश मिळवून दिलं. सिराजने घेतलेल्या विकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
All The Best Team India ❤️ #siraj#INDvPAK #ODIWorldCup2023 #BoycottIndoPakMatch #ICCWorldCup2023 #INDvsPAK#IndiaVsPakistan #Abhiya #Abhisha #BrandedFeatures #Gazagenocide #KingKohli pic.twitter.com/7xf6uaz6mp
— Ankit & Elvish (parody) (@AnkitElvishB) October 14, 2023
मोहम्मद सिराज याला पहिल्या ओव्हरपासूनच दोन्ही सलामीवीरांनी टार्गेट केलं होतं. जसप्रीत बुमराह याला सावध खेळत सिराजला ते टार्गेट करत होते. मागील म्हणजे अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यातही सिराज फरसा प्रभावी ठरला नाही. त्यामुळे आज सिराजवर सुरूवातीपासूनच आक्रमण करत त्याची लेंथ खराब केली.
रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाला दाद द्यायला हवी कारण सिराज याला मार पडत असतानाही त्याला थांबवलं नाही. तीन ओव्हरनंतरही त्याला गोलंदाजी दिलेली, रोहितच्या विश्वासाला तडा ना जावू न देता सिराजने कमाल करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. श्रीलंकेविरूद्ध शतक करणाऱ्या अब्दुल्ला शफीक याने तीन चौकार मारत चांगली सुरूवात केली होती. मात्र मोहम्मद सिराज याने त्याला 20 धावांवर माघारी पाठवलं.
भारताचा युवा स्टार खेळाडू शुबमन गिल वर्ल्ड कपच्या पहिल्या दोन सामन्यांना मुकला होता. डेंग्यूची लागण झाल्यामुळे त्याला अंतिम ११ मध्ये खेळता आलं नाही. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात आज गिल वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करत आहे. इशान किशन याच्या जागी त्याला संघात जागा मिळाली आहे.
अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ
रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज