नवी दिल्ली: T20 विश्वचषक 2021 नंतर काही महिन्यांनी UAE आशिया कप 2022 चे (Asia Cup 2022) आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी येथे झालेल्या विश्वचषक (World Cup) सामन्यात नाणेफेकीमुळे सामन्यात डाव पलटला होता. त्यावेळी झालेल्या नाणेफेकीमुळे सामन्याचे चित्र कसे पालटले होते हे आता कोणीही विसरणार नाही आणि विसरले गेलेही नाही. भारत-पाकिस्तान सामना (India-Pakistan match) असो वा नसो. दुबईच्या या मैदानावर पुन्हा एकदा दोन्ही संघ आमने-सामने आल्याने क्रिकेटविश्वात सगळ्यांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. गेल्या वर्षी या मैदानावर झालेल्या 13 विश्वचषक सामन्यांपैकी 12 सामने जिंकण्यात आले होते. मागील 10 महिन्यांपूर्वी UAE मध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकमध्ये पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सनी पराभव केला होता. या पराभवानंतरच भारताकडून पाकिस्तानवर विजय मिळवूनच पाकिस्तानला पराभवाच्या छत्रछायेखाली ठेवण्याचा प्रयत्न टीम इंडियाकडून आखण्यात आला आहे.
आशिया चषक सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत नाणेफेकीच्या प्रश्नावरुन भारतीय स्टार के.एल. राहुलला गेल्या वर्षी पाकिस्तानकडून 10 गडी राखून झालेल्या पराभवाची आठवण करून देण्यात आली. परंतु पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना त्याने सांगितले की, टीम इंडियाकडून गेल्या 10 महिन्यांपासून पाकिस्तानबरोबर विजयाचे खाते काढण्यासाठी एक महत्वाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. मागील 10 महिन्यांपूर्वी 24 ऑक्टोबर रोजी भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरला होता. त्या सामन्याची आठवण करून देताना केएल राहुल म्हणाला की, मोठ्या सामन्यांमध्ये नाणेफेकीची भूमिका महत्त्वाची असते. टी-20 विश्वचषकानंतर आम्ही खेळलेल्या टूर्नामेंटमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते.
नाणेफेक जिंकणे हे आमचे ध्येय आणि दृष्टी असल्याचेही केएल राहुलने सांगितले. या गोष्टीमुळे आत्मविश्वास मिळतो तसेच नाणेफेक जिंकली तर प्रथम फलंदाजी करायचीच हे आपल्या मनात नेहमी पक्के असते. यावेळी राहुलने सांगितले की, आम्ही सर्वोत्तम खेळ देण्याचा प्रयत्न करुच तसेच प्रत्येक संघाला विश्वचषकासारख्या स्पर्धेत आपली सुरुवात ही विजयानेच करायची असते, असे असले तरी दुर्दैवाने गेल्या वर्षी आमच्या बाबतीत हे मात्र घडले नाही असंही त्यांनी सांगितले. पाकिस्तान संघाकडून आमचा पराभव झाला असून त्यामुळेच आताचा सामना ही भारतीय टीमसाठी मोठी संधी आहे असंही त्यांनी सांगितले. भारत आणि पाकिस्तानचा सामना 28 ऑगस्टला आमने-सामने येणार आहेत.
या सामन्याविषयी बोलताना केएल राहुल म्हणाला की, या सामन्यासाठी भारतीय टीमच उत्सुक आहे. संघातील एक युवा खेळाडू म्हणून याकडे पाहणे निश्चितच उत्सुकतेचे असल्याचेही त्याने सांगितले.