मुंबई | ग्राउंड स्टाफच्या अथक मेहनतीनंतर आणि अनेक विघ्नानंतर अखेर पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामन्याचा निकाल लागला आहे. टीम इंडियाने राखीव दिवशी 11 सप्टेंबर रोजी पाकिस्तानवर 228 धावांच्या फरकाने विजय साकारला आहे. टीम इंडियाने यासह सुपर 4 मध्ये विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 357 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पाकिस्तानने 32 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 132 धावा केल्या. तर उर्वरित 2 फलंदाजांना दुखापत असल्याने ते बॅटिंगसाठी येऊ शकले नाहीत. अशा प्रकारे टीम इंडियाचा विजय झाला.
टीम इंडियाकडून कुलदीप यादव याने 5 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकुर, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह या तिघांनी 1-1 विकेट घेतली. त्याआधी विराट कोहली-केएल राहुल या जोडीने नाबाद शतकी खेळी केली. तर रोहित शर्मा-शुबमन गिल या जोडीनी वैयक्तिक अर्धशतक झळकावली. टीम इंडियाने या आधारावर 50 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून 356 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि शादाब खान या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
कोलंबो | टीम इंडियाने पाकिस्तानवर 228 धावांनी मोठा विजय मिळवला. टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 357 रन्सचं टार्गेट दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या धारदार बॉलिंगसमोर पाकिस्तान गुडघे टेकले. टीम इंडियाने पाकिस्तानला 31.6 ओव्हरमध्ये 128 धावांवर 8 झटके दिले. त्यानंतर टीम इंडियाचा विजय झाल्याचं जाहीर करण्यात आलं. पाकिस्तानकडून एकालाही तिशीपार मजल मारला आली नाही. फखर झमान याने सर्वाधिक 27 धावा केल्या. तर आघा सलमान आणि इफ्तिखार अहमद या दोघांनी प्रत्येकी 23 धावा केल्या. याशिवाय इतरांना विशेष काहीच करता आलं नाही. टीम इंडियाकडून कुलदीप यादव याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
कोलंबो | कुलदीप यादव याने इफ्तिखार अहमद याला आपल्याच बॉलिगवर 23 धावांवर कॅच आऊट केलंय.
कोलंबो | कुलदीप यादव याने पाकिस्तानला सहावा झटका दिला आहे. कुलदीपने शादाब खान याला 6 धावांवर शार्दुल ठाकूर याच्या हाती कॅच आऊट केलं.
कोलंबो | कुलदीप यादव याने आघा सलमान याला एलबीडब्ल्यू आऊट करत पाकिस्तानला पाचवा झटका दिला आहे. आघा सलमान 23 धावांवर आऊट झाला.
कोलंबो | आघा सलमान याने बॅटिंग दरम्यान हेल्मेट न घातल्याने तो रक्तबंबाळ झाला. रविंद्र जडेजाच्या बॉलिंगवर हा सर्व प्रकार घडला.
कोलंबो | कुलदीप यादवने फखर झमान याला क्लिन बोल्ड करत पाकिस्तानला चौथा झटका दिलाय. झमान याने 27 धावा केल्या. फखरला आऊट करत कुलदीपने सामन्यातील पहिली विकेट घेतली.
कोलंबो | शार्दुल ठाकुर याने आपल्या कोट्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये पाकिस्तानला झटका दिला आहे. शार्दुलने मोहम्मद रिझवान याला विकेटकीपर केएल राहुल याच्या हाती कॅच आऊट केलं. रिझवानने 5 बॉलमध्ये 2 धावा केल्या.
कोलंबो | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामन्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यानंतर आता 9 वाजून 20 मिनिटांनी सामन्याला पुन्हा सुरुवात होणार आहे. पूर्ण 50 ओव्हर्सचा खेळ होणार आहे.
कोलंबो | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामना पुन्हा एकदा पावसामुळे थांबला आहे. पाकिस्तानने 357 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना 2 विकेट्स गमावून 11 ओव्हरमध्ये 44 धावा केल्या आहेत. पाकिस्तानला विजयासाठी अजून 313 धावांची गरज आहे.
कोलंबो | हार्दिक पंड्या याने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. हार्दिकने पाकिस्तान कॅप्टन बाबर आझम याला क्लिन बोल्ड केलं आहे. बाबरने 10 धावा केल्या.
पाकिस्तानने सावध सुरूवात केली असून मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी पाकचे ओपनर फखर जमान, इमाम उल हक यांच्यावर नियंत्रण मिळवलं आहे. जमान याला अद्याप खातंही उघडता आलं नाही.
पाकिस्तानचा संघ भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आहे. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह, सिराज सुरूवातीलाच काही धक्के देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कोलंबो | टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 357 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 356 धावा केल्या. टीम इंडियाकडून केएल राहुल आणि विराट कोहली या दोघांनी नाबाद शतकी खेळी केली. तर त्याआधी रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी अर्धशतकं ठोकली.
कोलंबो | केएल राहल याच्यानंतर विराट कोहली यानेही खणखणीत शतक ठोकलंय. विराटने यासह वनडे क्रिकेटमध्ये वेगवान 13 हजार धावांचा विक्रमही केला आहे.
कोलंबो | केएल राहुल याने पाकिस्तान विरुद्ध जोरदार वनडे कमबॅक केलं आहे. केएल राहुल याने विराटसोबत विक्रमी भागीदारी केली. या दरम्यान केएलने शतक पूर्ण केलं. केएलने 100 बॉलमध्ये शतक ठोकलं.
कोलंबो| टीम इंडियाच्या विराट कोहली आणि केएल राहुल या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 149 बॉलमध्ये 153 धावांची भागीदारी पूर्ण केली आहे. विराट कोहली याने टीम इंडियाच्या डावातील 42.3 ओव्हरमध्ये इफ्तिखार अहमद याच्या बॉलवर फोर ठोकला. यासह तिसऱ्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी केली.
कोलंबो | केएल राहुल याच्यानंतर टीम इंडियाच्या विराट कोहली यानेही अर्धशतक पूर्ण केलंय. विराटने 55 बॉलमध्ये हे अर्धशतक ठोकलं. विराटच्या वनडे कारकीर्दीतील 66 वं अर्धशतक ठरलं.
कोलंबो | विराट कोहली आणि केएल राहुल या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 102 बॉलमध्ये 100 धावांची भागीदारी केली आहे. केएलने या दरम्यान अर्धशतक पूर्ण केलं.
कोलंबो |केएल राहुल याने 35 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर शादाब खान याच्या बॉलिंगवर 84 मीटर लांब कडक सिक्स ठोकलाय.
कोलंबो | केएल राहुल याने दुखापतीच्या 6 महिन्यानंतर दमदार कमबॅक करत शानदार अर्धशतक ठोकलंय. केएलने या दरम्यान 5 चौकार आणि 1 षटकार ठोकला.
कोलंबो | टीम इंडियाच्या विराट कोहली आणि केएल राहुल या जोडीने राखीव दिवसाची शानदार सुरुवात केली आहे. या दोघांनी पहिल्या 3-4 ओव्हर्समध्ये जोरदार फटकेबाजी केली.
कोलंबो | पावसाच्या विश्रांतीनंतर अखेर राखीव दिवशी पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामन्याला 4 वाजून 40 मिनिटांनी सुरुवात झाली आहे. रविवारी सामना जिथे थांबला तिथून पुढे सुरु झाला आहे. टीम इंडियाकडून विराट कोहली आणि केएल राहुल खेळत आहेत.
कोलंबो | पाऊस आणि खराब हवामानामुळे टीम इंडिया-पाकिस्तान सामन्यातील मुख्य दिवस आणि राखीव दिवसातील काही तास वाया गेले. त्यानंतर अखेर आता सामन्याला सुरुवात होणार आहे. दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
कोलंबो | पाकिस्तान-टीम इंडिया सामन्याबाबत बीसीसीआयने ट्विटद्वारे मोठी अपडेट दिली आहे. दुपारी 4 वाजून 20 मिनिटांनी पाहणी करण्यात येणार असल्याचं बीसीसीआयने म्हटलंय.
Update: We will have an inspection at 4:20 PM IST. #TeamIndia #INDvPAK
— BCCI (@BCCI) September 11, 2023
कोलंबो | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया या सामन्याच्या राखीव दिवसातील सुरुवातीचा एक तास पावसामुळे वाया गेला आहे. पावसामुळे सामन्याच्या मुख्य दिवसात खेळ पार पडू न शकल्याने राखीव दिवसात सामना होत आहे.
कोलंबो | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया आशिया कप 2023 मधील सुपर 4 सामन्यात आमनेसामने आहेत. सामन्याचा मुख्य दिवशी पावसामुळे वाया गेला. त्यामुळे आता राखीव दिवशी आज (11 सप्टेंबर) उर्वरित सामना होणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये हवामान खेळ होण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. एसीसीने ट्विट करत याबाबत क्रिकेट चाहत्यांना आश्वस्त केलंय.
कोलंबोतील हवामान
Clear skies : Every cricket fan’s desire today!
The weather is cricket friendly and we are prepared.
Pakistan vs India resumes today, at 3PM!#AsiaCup2023 #PAKvsIND pic.twitter.com/xvoyrzGEF6— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 11, 2023
आशिाया कपमधील भारत-पाकमध्ये दुसरा सामना सुरू होता. या सामन्यात भारताचीही पहिली इंनिग पूर्ण झाली. उद्या म्हणजेच सोमवारी सामन्याच्या वेळेनुसार दुपारीच होणार आहे.
भारताला इथून फलंदाजी करता आली नाही आणि पाकिस्तानला 20 षटके खेळण्यास मिळतील. तसं झालं तर त्यांना विजयासाठी 181 धावा कराव्या लागतील. जर आज एकही चेंडू टाकला नाही तर सामना राखीव दिवशी (११ सप्टेंबर) जाईल.
दुसऱ्या तपासणीतही काहीही स्पष्ट होऊ शकले नाही. आतापर्यंत सामना सुरू होण्याबाबत कोणतेही अपडेट आलेले नाही. 8:30 वाजता तिसरी तपासणी होईल. त्यानंतर सामना सुरु करायचा की नाही ते स्पष्ट होईल.
कोलंबो | आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पाऊस थांबला आहे. कव्हर हटवण्यात आले आहेत. खेळपट्टीवरील आणि मैदानातील पाणी हटवण्यात आलंय. आता 7 वाजून 30 मिनिटांनी पुढील पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच सामना किती वाजता सुरु होईल याबाबत माहिती मिळेल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे.
कोलंबो | टीम इंडिया-पाकिस्तान सामन्यात पावसामुळे एक तासाचा खेळ वाया गेलाय. जवळपास 40-50 मिनिटं पडल्यानंतर पावसाने विश्रांती घेतलीय. त्यानंतर आता ग्राउंड स्टाफने कव्हर हटवायला सुरुवात केलीय. तर आता खेळपट्टी आणि आसपासचा भाग हा स्पंजने सुकवला जात आहे. त्यामुळे आता थोड्याच वेळा सामन्याला सुरुवात होणार आहे.
कोलंबो | पाकिस्तान-टीम इंडिया सामन्यात पाऊस सुरु झाला आहे. पावसामुळे खेळ थांबला आहे. पावसाने एन्ट्री घेतल्याने ग्राउंड स्टाफची एकच धावाधाव झाली. मात्र काही मिनिटात या ग्राउंड स्टाफने कव्हरच्या मदतीने पीच आणि आसपासचा भाग झाकला.
टीम इंडियाला दुसरा धक्का बसला असून रोहित पाठोपाठ आता शुबमन गिल आऊट झाला आहे. शाहिन आफ्रिदीने त्याला कॅच आऊट केलं. गिल 58 धावा काढून बाद झाला असून मैदानात आता के. एल. राहुल आला आहे.
कर्णधार रोहित शर्मा चांगल्या सुरूवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. ज्या शादाबला रोहितने फोडलं त्यालाचा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो कॅचआऊट झाला. रोहित 56 धावांवर माघारी परतला आहे. आता मैदानात विराट कोहली उतरला आहे.
टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण झाल्या असून सलामीवीर शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी तोडफोड बॅटींग केली आहे. सामन्याच्या पहिल्या ओव्हरपासून रोहितने शाहिनला सिक्सर मारत सुरूवात केली होती. त्यानंतर गिलनेही गिअर टाकला आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांचा घाम काढला. रोहित नाबाद 10 आणि शुबमन गिल नाबाद 39 धावांवर खेळत आहे.
शाहिन आफ्रिदीला शुबमन गिल याने पाचव्या ओव्हरमदध्ये सलग तीन चौकार मारले. नवख्या पोराने वर्ल्ड बेस्ट बॉलरला कडक चौकार मारत त्याची ताकद दाखवून दिली. रोहित 10 तर गिल 25 धावांवर खेळत आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने शाहिन आफ्रिदीला सिक्स आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये नसीमला चौकार मारत आक्रमक सुरूवात केली आहे.
दोन्ही संघांचे राष्ट्रगीत झालं असून मैदानात आता रोहित शर्मा आणि शुबमन गिल उतरले आहेत. दोघांसमोर शाहिन आफ्रिदी आणि पाकिस्तानच्या इतर गोलंदजांचं आव्हान असणार आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये बाबर आझमने प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. श्रेयस अय्यर हा दुखापतीमुळे बाहेर झाला आहे.
आजच्या सामन्याची खेळपट्टी पाहता ऊन पडल्यामुळे गोलंदाजांना चांगली मदत मिळणार आहे. टॉस जिंकणारा कर्णधार टॉस जिंकून प्रथम बॅटींगचा निर्णय घेवू शकतो.
काही वेळातच टॉस होणार असून आज टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला दमखम दाखवावा लागणार आहे. खास करून सलीमीची जोडी रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी दमदार भागीदारी केली तर टीम इंडियाला त्याचा फायदा होणार आहे.
भारत पाकिस्तान सामन्याआधी वातावरण एकदम ताजेतवाणं दिसत आहे. मैदानावर ऊन पडलेलं दिसत आहे. चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
भारत-पाक सामन्याला काही तासांचा अवधी बाकी आहे. या सामन्याआधी शोएब अख्तरने, पावसाचं काहीच टेन्शन नाही. पाकिस्तानपासून सावध राहा, असं ओपन चॅलेंज दिलं होतं. या चॅलेंजला उत्तर देण्यासाठी टीम इंडिया तयार आहे.
भारत-पाक सामना ज्या मैदानावर होणार आहे त्या मैदानावर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र सामन्याअगोदर आज मस्त ऊन पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वातावरणात काही बदल झाला नाहीतर सामना आजच होईल.
टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग 11| बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), फहीम अशरफ, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रीदी आणि हारिस रऊफ.
टीम इंडिया आणि पाकिस्तानचा सामना फुकटात पाहता येणार असून त्यासाठी कोणतेही वेगळे पैसे मोजण्याची गरज नाही. टीव्हीवर हा सामना डी डी स्पोर्ट्स तर तर मोबाईलवर हॉट स्टार हे अॅप डाऊनलोड करून पाहता येणार आहे.
आतापर्यंत वन डे क्रिकेटमधील हेड टू हेड आकडेवारी पाहिलीत तर त्यामध्ये पाकिस्तानचं पारडं जड आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण 133 सामने झाले असून त्यामधील 55 सामने टीम इंडियाने जिंकलेत तर पाकिस्तानने 72 सामने जिंकले आहेत. तर पाच सामन्यांचा निका लागू शकला नाही.