मुंबई : आशिया कप 2o23 मधील टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील तिसरा सामना हा रद्द झाला आहे. सततच्या पावसाच्या व्यत्ययामुळे मॅच रेफरी आणि पंचानी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि पाकिस्तान कॅप्टन बाबर आझम या दोघांना मर्जीत घेऊन सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. पावसामुळे पहिल्या डावात 2 वेळा खेळ थांबवावा लागला. त्यामुळे 53 मिनिटांचा खेळ वाया गेला. तर पहिल्या डावातनंतर पावसाने व्यत्यय आणला. पाऊस थांबत नसल्याने अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय झाला.
सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून पाकिस्तानला विजयासाठी 267 धावांचं आव्हान ठेवलं. टीम इंडियाकडून हार्दिक पंड्या याने 87 आणि ईशान किशन याने 82 धावांची खेळी केली. तर पाकिस्तानकडून शाहिन अफ्रिदी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर नसीम शाह आणि हरीस रऊफ या जोडीने प्रत्येकी तिघांना गुंडाळलं. मात्र पावसामुळे पाकिस्तानला बॅटिंगच मिळाली नाही. दरम्यान पाकिस्तानने या सामन्यानंतर सुपर 4 मध्ये धडक दिली आहे. तर टीम इंडियाचा पुढील सामना हा न4 सप्टेंबर रोजी नेपाळ विरुद्ध होणार आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन) | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, इशान किशन (उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
पाकिस्तान संघ (प्लेइंग इलेव्हन) | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हॅरिस रॉफ.
पल्लेकेले | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील आशिया कपमधील तिसरा सामना हा पावसामुळे रद्द झाला आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 267 रन्सचं टार्गेट दिलं होतं. मात्र दुसऱ्या डावाला 1 तास होऊनही पावसामुळे सुरुवात होऊ शकली नाही. त्यामुळे अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पल्लेकेले | पावसामुळे दुसऱ्या डावाला सुरुवात होण्यास उशीर होत आहे. मॅच सुरु झाल्यापासून आतापर्यंत 2 पेक्षा अधिक वेळा सामना खोंलबलाय. टीम इंडियाने पाकिस्तानला 267 धावांचं आव्हान दिलंय. त्यानंतर पाकिस्तानच्या बॅटिंगला सुरुवात होईल, या प्रतिक्षेत क्रिकेट चाहते आहेत. मात्र अजूनही सामना सुरु झालेला नाही. त्यामुळे आता काही ओव्हर्स कमी केल्या जाण्याची शक्यता आहे.
पल्लेकेले | पावसाने पुन्हा एकदा सामन्यात खोडा घातलाय. त्यामुळे सामन्याच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होण्यात उशीर होत आहे. बीसीसीआयने ट्विटद्वारे सामन्याला विलंब होत असल्याची माहिती दिलीय. आता 9 वाजता पंचाकडून पीचची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
भारत-पाक सामन्यात पुन्हा पाऊस
UPDATE
Inspection at 09.00 PM Local Time (Same as IST). #AsiaCup2023 | #TeamIndia | #INDvPAK https://t.co/DJlHh9D58M
— BCCI (@BCCI) September 2, 2023
भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकात सर्वबाद 266 धावा केल्या आणि विजयासाठी 267 धावांचं आव्हान दिलं. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी डाव सावरला. दोघांनी अर्धशतकी खेळी करत भारताला सन्मानजनक धावा करून दिल्या.
ASIA CUP 2023. WICKET! 48.5: Jasprit Bumrah 16(14) ct Agha Salman b Naseem Shah, India 266 all out https://t.co/B4XZw382cM #INDvPAK
— BCCI (@BCCI) September 2, 2023
पल्लेकेले | टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरनंतर ऑलराउंडर्सनी निराशा केली आहे. हार्दिक पंड्या आऊट झाल्यानंतर टीम इंडियाने सलग 2 विकेट्स गमावल्या. रविंद्र जडेजा 44 व्या ओव्हरच्या सहाव्या बॉलवर आऊट झाला. जडेजाने 14 धावा केल्या. त्यानंतर 45 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर शार्दुल ठाकुर याने लेग साईडला खेळण्याच्या प्रयत्नात मोठा फटका मारला. मात्र पाकिस्तानच्या शादाब खान याने अप्रतिम कॅच घेतला. टीम इंडियाने अशाप्रकारे 2 बॉलवर 2 विकेट्स घेतल्या.
पल्लेकेले | टीम इंडियाला सहावा झटका लागला आहे. हार्दिक पंड्या 87 धावांवर आऊट झाला आहे. हार्दिकने 90 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 सिक्स ठोकला. हार्दिकच्या या खेळीने टीम इंडियाने सामन्यात कमबॅक केलं. मात्र ईशाननंतर हार्दिक यालाही शतक ठोकण्यात अपयश आलं.
पल्लेकेले | हरीस रौफ याने टीम इंडियाची सेट जोडी फोडली आहे. हरीसने ईशान किशन याला आऊट करत टीम इंडियाला पाचवा झटका दिला. ईशानने 82 धावांची गेमचेजिंग खेळी केली.
पल्लेकेले | टीम इंडियाच्या 200 धावा पूर्ण झाल्या आहेत. टीम इंडियाने 36.4 ओव्हरमध्ये 200 रन्स पूर्ण केल्या. हार्दिक पंड्या आणि ईशान किशन या दोघांनी टीम इंडियाला सावरलं आणि चांगल्या स्थितीत आणून ठेवलंय. या दोघांनी या दरम्यान 130 पेक्षा अधिक धावांची नाबाद भागीदारी केली.
पल्लेकेले | ईशान किशन याच्यानंतर उपकर्णधार हार्दिक पंड्या यानेही अर्धशतक पूर्ण केलंय. हार्दिकने 62 बॉलमध्ये अर्धशतक केलंय. ईशान आणि हार्दिक या दोघांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारीही पूर्ण केली.
Hardik Pandya joins the party with a fine half-century 🙌🙌
Live – https://t.co/B4XZw382cM… #INDvPAK pic.twitter.com/CDsjyzbAeq
— BCCI (@BCCI) September 2, 2023
पल्लेकेले | ईशान किशन याने पाकिस्तान विरुद्ध वनडे कारकीर्दीतील 7 वं अर्धशतक पूर्ण केलंय. ईशानने 54 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. ईशानच्या या अर्धशतकीमुळे टीम इंडियाचा डाव सावरलाय. ईशान आणि हार्दिक पंड्या दोघही भक्कमपणे मैदानात उभे आहेत.
ईशानची पाकिस्तान विरुद्ध अर्धशतकी झुंज
FIFTY!
A well made half-century by @ishankishan51 off 54 deliveries 👏👏
His 7th in ODIs!
Live – https://t.co/B4XZw382cM… #INDvPAK pic.twitter.com/6FII0XRTRu
— BCCI (@BCCI) September 2, 2023
पल्लेकेले | टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. ईशान किशन आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या ही जोडी जमली आहे. या दोघांवर टीम इंडियाची जबाबदारी आहे.
पल्लेकले | पाकिस्तानच्या माऱ्यासमोर टीम इंडियाची टॉप ऑर्डर सपशेल फ्लॉप ठरली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर याच्यानंतर शुबमन गिल हा देखील आऊट झालाय. गिलने 10 धावा केल्या.
पल्लेकले | इशान किशन याने हरिस रौफ याच्या बॉलिंगवर जोरदार सिक्स ठोकला. ईशानने 12 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर सिक्स मारला. ईशानला या सिक्समुळे नक्कीच विश्वास मिळेल.
पल्लेकले | टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पुन्हा एकदा पाऊस थांबला आहे. त्यामुळे सामन्याला सुरुवात झाली आहे. ईशान किशन आणि शुबमन गिल ही युवा जोडी मैदानात खेळत आहे.
पल्लेकेले | टीम इंडिया-पाकिस्तान सामन्यात पुन्हा एकदा पावसाने एन्ट्री घेतली आहे. पाऊस आल्याने पुन्हा एकदा खेळ थांबवण्यात आला आहे. टीम इंडियाचा स्कोअर 11.2 ओव्हरमध्ये 3 आऊट 51 असा आहे. इशान किशन आणि शुबमन गिल ही जोडी मैदानात खेळत आहे.
पावसामुळे खेळ थांबला
Second interruption as rain stops play here at Pallekele.#AsiaCup2023 pic.twitter.com/bZbSXTvgoI
— BCCI (@BCCI) September 2, 2023
पल्लेकेले | टीम इंडियाने झटपट 3 विकेट्स गमावल्या आहेत. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना शाहिन आफ्रिदी याने आऊट केलं. तर त्यानंतर हरिस रौफ याने श्रेयस अय्यरला आऊट करत टीम इंडियाला तिसरा झटका दिला आणि आपली पहिली विकेट मिळवली. श्रेयसने 14 धावा केल्या. झटपट 3 विकेट गमावल्याने टीम इंडिया बॅकफुटवर गेली आहे.
पल्लेकेले | शाहिन आफ्रिदी याने टीम इंडियाला दुसरा झटका दिला आहे. शाहिनने टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याला आऊट केलं. त्यानंतर शाहिनने विराट कोहली याचा काटा काढला. त्यामुळे आता टीम इंडियाला मोठ्या भागीदारीची गरज आहे.
पल्लेकेले | टीम इंडियाने मोठी विकेट गमावली आहे. शाहिन अफ्रिदी याने कॅप्टन रोहित शर्मा याला क्लिन बोल्ड केलंय. रोहितने 11 धावा केल्या. रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर विराट कोहली बॅटिंगसाठी मैदानात आला.
भारत-पाक सामना सुरू असताना पाऊस आल्याने काही वेळ सामना थांबवण्यात आला होता. काही वेळात सामना सुरू होणार आहे.
नसीम शहाची आग ओकणारी बॉलिंग होत असून पाकिस्तानविरूद्धचा पहिला सामना खेळणारा युवा शुबमन गिल सावध पवित्रा घेऊन खेळत आहे. चार ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या 15-0 स्कोर आहे. रोहि 11 धावांवर खेळत असून अद्याप गिलने खातं उघडलं नाही.
दोन ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या नऊ धावा झाल्या असून रोहित शर्मा 7 आणि शुबमन गिल 0 धावांवर खेळत आहे.
पल्लेकेले | टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामी जोडी मैदानात आली आहे. तर शाहिन आफ्रिदी पहिली ओव्हर टाकत आहे. त्यामुळे अंडर 19 वर्ल्ड कपनंतर शुबमन गिल-शाहिन आफ्रिदी आमनेसामने आले आहेत. त्यामुळे आता या गिल विरुद्ध अफ्रिदी लढाईत कोण वरचढ ठरतं, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Ind vs Pak Live Score : टीम इंडियाची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
पाकिस्तान संघ (प्लेइंग इलेव्हन) | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हॅरिस रऊफ.
टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माने चार बॉलर आणि दोन फिरकीपटू खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांना खाली बसवण्यात आलं आहे.
भारत-पाक सामन्यामध्ये दुपारच्या वेळेत 55 टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यासोबतच विजांचा कडकडाटही होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे चाहते चिंतेत पडले आहेत.
भारत पाकिस्तान सामन्यामध्ये पाऊस आला आणि त्या दिवशी सामना नाही झाला तर कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. दोन्ही संघांना एक-एक गुण देऊन टाकण्यात येणार आहे.
IND vs PAK : आता 4 वर्षांनी महामुकाबला होणार आहे. आता हा सामना जिंकून पाकिस्तानला सुपर 4 मध्ये पोहचण्याची संधी आहे. तर टीम इंडिया विजयी सुरुवात करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.