मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाचा डाव अवघ्या 191 धावांवरच आटोपला. भारताच्या गोलंदाजांनी खतरनाक प्रदर्शन करत पाकिस्तानच्या बत्या गुल केल्या. पाकिस्तान संघाने 30 ते 35 धावांच्या आतमध्ये जवळपास सहा विकेट्स गमावल्या. एखाद्या पत्त्यांचा बंगला धाडधाड कोसळतो तसा पाकिस्तान संघ ऑल आऊट झाला. मात्र 30 व्या ओव्हरमध्ये पाकिस्तान संघावर खरा घाव बसला.
भारताच्या पाच गोलंदाजांनी दोन-दोन विकेट्स घेतल्या. प्रत्येक गोलंदाजाने कडक प्रदर्शन करत पाकिस्तान संघाला बॅकफूटवर ढकललं. पाकिस्तान संघाच्या दोन विकेट गेल्या होत्या त्यानंतर मैदानात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान होते. दोघांनीही संघाचा डाव सावरला होता पण रोहितने परत एकदा फॉर्ममध्ये नसलेल्या मोहम्मद सिराजला माघारी बोलावलं.
बाबर आझम याची विकेट सिराजने मिळवून दिली, या विकेटनंतर पाकिस्तान संघाला खऱ्या अर्थाने सुरूंग लागला. बाबर आझम अर्धशतक करून बाद झाला. बाबरची विकेट गेल्यानंतर कोणत्याही फलंदाजाला जास्त वेळ तग धरता आला नाही. ना कोणतीही मोठी भागीदारी भारताच्या वेगवान गोलंदाजांनी करू दिली नाही. या सामन्यामध्ये भारताने ७ विकेट राखून विजय मिळवत गुणतालिकेमध्ये नंबर एकवर झेप घेतली.
अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ
रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज