आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात मोठा सामना हा टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार आहे. वर्ल्ड कप फायनलपेक्षा या सामन्याचं महत्त्व अधिक आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. साऱ्या क्रिकेट विश्वाचं या सामन्याकडे लक्ष लागून राहिलं आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर बाबर आझम याच्याकडे पाकिस्तानची कॅप्टन्सी आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना प्रतिष्ठेचा आणि वर्ल्ड कपपेक्षा मोठा असणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या सामन्यात रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी 9 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना नासाऊ क्रिकेट काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, न्यूयॉर्क येथे होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर डीडी स्पोर्ट्सवर सामना फुकटात पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार या एपवर पाहायला मिळेल.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीम : बाबर आजम (कप्तान), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफ्रीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सईम अयूब, शादाब खान, शाहीन शाह अफ्रीदी आणि उस्मान खान.