IND Vs SA | शतक ठोकणाऱ्याला बाहेर बसवणार! कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11

| Updated on: Dec 11, 2023 | 9:48 PM

South Africa vs India 2nd T20i | टीम इंडियाला मालिकेत आघाडी घ्यायची असेल तर कॅप्टन सूर्यकुमार यादव याला परफेक्ट अशी प्लेईंग ईलेव्हन निवडावी लागेल. मात्र एका जागेवरुन चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कॅप्टन सुर्यकुमार यादव कुणाला नाराज करणार?

IND Vs SA | शतक ठोकणाऱ्याला बाहेर बसवणार! कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11
Follow us on

मुंबई | टीम इंडिया 10 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यासाठी सज्ज होती. या सलामीच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने जोरदार तयारी केली होती. मात्र सामन्याआधीच पावसाने सुरुवात केली. पावसाने चांगली 2-3 तास बॅटिंग केली. त्यामुळे पहिला सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांची मेहनत वाया गेली. आता दुसरा सामना हा 12 डिसेंबरला होणार आहे. पहिला सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांचा दुसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. कारण दुसरा सामना जिंकणारा संघ मालिका बचावण्यात यशस्वी ठरेल.

टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन कशी असू शकते?

आता दक्षिण आफ्रिका विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन कशी असेल, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. मालिकेतील 2 सामनेच असल्याने कॅप्टन सूर्यकुमार यादव कोणतीही जोखीम पत्कारणार नाही. शुबमन गिल याची एन्ट्री निश्चित आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातून स्टार बॅटसमनला प्लेईंग ईलेव्हनमधून बाहेर बसावं लागू शकतं. ऋतुराज गायकवाड याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 मालिकेत शतक केलं होतं. ओपनिंग जोडी म्हणून यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल या दोघांना ओपनिंग जोडी म्हणून पहिली पसंती दिली जाऊ शकते. कारण लेफ्ट राईट कॉम्बिनेशन टीमच्या हिशोबाने फायदेशीर असतं.

कॅप्टन तोच मात्र उपकर्णधार नवा

दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेतील पहिल्या 3 सामन्यात ऋतुराज गायकवाड याने टीम इंडियाचं उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. तर अखेरच्या 2 सामन्यांसाठी श्रेयस अय्यर याला ही जबाबदारी दिली होती. मात्र आता दक्षिण आफ्रिके विरुद्ध रवींद्र जडेजा उपकर्णधार म्हणून कॅप्टन सूर्यकुमार यादव याला मदत करताना दिसणार आहे.

दक्षिण आफ्रिका 20 टीम | एडेन मार्करम (कर्णधार), बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीटक्जे, नांद्रे बर्गर, डोनोवॅन फरेरिया, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिजाड विलियम्स, गेराल्ड कोएत्झी, मार्को जानेसन आणि लुंगी एन्गिडी. (शेवटच्या तिघांना पहिल्या 2 सामन्यांसाठी संधी)

टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चाहर.