मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात यंगिस्तानने 106 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली आहे. पहिला सामना पावसाने रद्द झाला, दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना कराव लागला होता. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं. या सामन्यात विजय मिळवला असला तरी सामन्यानंतर एक गोष्ट समोर आली आहे. सुदैवाने त्याचा टीम इंडियाला फटका बसला नाही.
टीम इंडियाने दिलेल्या डोंगराएवढ्या लक्षाचा पाठलाग करताना आफ्रिका संघाची खराब अवस्था झालेली पाहायला मिळाली होती. कारण अवघ्या 95 धावांवर आफ्रिकेचा संघ ऑल आऊट झाला यामध्ये फक्त डेव्हिड मिलर याने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. मिलरला कुलदीप यादव याने बोल्ड करत ऑल आऊट केलं. पण खरं म्हणजे मिलर हा आधीच आऊट झाला होता, तरीपण तो वाचला त्यासाठी त्याचं नशीब म्हणाावं लागेल.
डेव्डिह मिलर याच्याकडे एकट्याच्या दमावर सामना पालटवण्याची ताकद आहे. याआधी अनेक सामन्यांमध्ये तुफानी खेळी करत संघाला सामने जिंकून दिले आहेत. काल झालेल्या सामन्यात 9 व्या ओव्हरमध्ये जडेदजा बॉलिंग करत असताना चौथा चेंडू मिलर याच्या बॅटची कडा घेऊन कीपर जितेश शर्मा याच्या हातात गेला. त्यावेळी मिलरचे नशीब त्याच्या बाजूने होते कारण त्यावेळी डीआरएसउपलब्ध नव्हता. तांत्रिक बिघाडामुळे त्याचा वापर करता येणार नव्हता. मात्र रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत होतं की त्याच्या बॅटला चेंडू लागला आहे.
There was an edge from David Miller’s bat, but DRS is currently unavailable so it was not out. pic.twitter.com/30IbVbj8MQ
— Cricfobia (@Cricfobia22) December 14, 2023
दरम्यान, डेव्हिड मिलरला आऊट असल्याचा जडेजाला विश्वास होता पण डीआरएस उपलब्ध नसल्याने सगळेच हतबल झाले होते. मात्र मिलरलाही त्याचा फार काही फायदा घेता आला नाही. पण जर चमत्कार घडला असला तर आणि मिलरने सामना जिंकवला असता तर तांत्रिक बिघाड टीम इंडियाच्या पराभवाचा टर्निंग पॉईंट ठरला असता.