Video | सिंह इज किंग! अर्शदीपने पहिल्याच ओव्हरमध्ये दोन बॉलवर घेतल्या दोन विकेट, पाहा व्हीडिओ

| Updated on: Dec 17, 2023 | 2:15 PM

Arshdeep Singh two wicket video : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये अर्शदीप सिंहने सलद दोन बॉलवर दोन विकेट घेतल्या आहेत. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video | सिंह इज किंग! अर्शदीपने पहिल्याच ओव्हरमध्ये दोन बॉलवर घेतल्या दोन विकेट, पाहा व्हीडिओ
arshdeep singh two wickets two ball
Follow us on

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील पहिल्या वन डे सामन्याला सुरूवात झाली आहे. आफ्रिका संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. आफ्रिका संघाने टॉस जिंकला असला तरी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने कडक सुरूवात करून दिली आहे. गड्याने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट आफ्रिका संघाला बॅकफूटवर ढकललं आहे.

पाहा व्हीडिओ:-

 

सामन्याची पहिली ओव्हर मुकेश कुमार याने टाकली. पहिल्याच बॉलवर विकेटसाठी अपील झाली होती. मात्र टीम इंडियाने त्यावेळी डीआरएस घेतला नाही. डीआरएसमध्ये मुकेश कुमार याला विकेट मिळाली असल्याचं दिसत होतं. त्यानंतर टीम इंडिासाठी अर्शदीप दुसरी ओव्हर घेऊन आला होता.

अर्शदीप सिंहने चौथ्या बॉलवर रीझा हेंड्रिक्स याला आऊट केलं, मोठ फटका मारण्याच्या प्रयत्नात असलेला हेंड्रिक्स बॅटची कट लागून चेंडू स्टम्पवर बसला. त्यानंतर आलेल्या रॅसी व्हॅन डर ड्युसेन याला एलबीडब्ल्यू आऊट करत सलग दुसरा धक्का दिला. अर्शदीप हॅट्रीकवर होता मात्र एडन मार्करम याने सहावा बॉल खेळून काढत हॅट्रिक होऊ दिली नाही. मात्र काहीसा आऊट फॉर्म असलेल्या अर्शदीपचा या दोन विकेटने आत्मविश्वास वाढला.

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी

भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (w/c), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार