मुंबई : टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी रवाना झाली आहे. या दौऱ्यात हे. 3 टी-20, 3 वन डे आणि 2 कसोटी सामने होणार आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये वेगवेगळ्या कॅप्टनची निवड केली आहे. ज्यनिअर आणि सीनिअर संघ या दौऱ्यात गेलेला दिसणार आहे. कसोटीमध्ये प्रमुख खेळाडू दिसतील आणि वन डे आणि टी-20 मध्ये युवा खेळाडूंना संधी दिली आहे. टीम इंडियाचे युवा खेळाडू रिंकू सिंग आणि टिळक वर्मा यांनी फ्लाईटमधील आपले फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
VIDEO | Indian cricket team left for South Africa from Bengaluru earlier today. The Indian team will tour South Africa from December 10 to January 7 to play 3 T20Is, 3 ODIs and 2 Tests.#INDvsSA pic.twitter.com/ez4mBMaR5k
— Press Trust of India (@PTI_News) December 6, 2023
भारताचा कसोटी संघ: रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, इशान किशन (WK), केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत-बुमराह (VC) , शार्दुल ठाकूर, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद. शमी.
वनडेसाठी भारतीय संघ: के.एल. राहुल (C), रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (WK), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, दीपक चहर, युझवेंद्र चहल. , मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग.
टी-20 साठी भारताचा संघ: यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (WK), जितेश शर्मा (WK), रवींद्र जडेजा (VC), दीपक चहर , वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार.