IND vs SL Live Streaming | दक्षिण आफ्रिकासाठी टीम इंडिया विरुद्ध विजय महत्त्वाचा, मॅच कुठे पाहता येणार?

| Updated on: Nov 04, 2023 | 5:51 PM

India vs South Africa Live Streaming | रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने सलग 7 सामने जिंकत सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. टीम इंडिया आठव्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध 2 हात करणार आहे.

IND vs SL Live Streaming | दक्षिण आफ्रिकासाठी टीम इंडिया विरुद्ध विजय महत्त्वाचा, मॅच कुठे पाहता येणार?
Follow us on

कोलकाता | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 37 वा सामना हा टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर टेम्बा बावुमा याच्याकडे दक्षिण आफ्रिका टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. टीम इंडिया आधीच सेमी फायनलमध्ये पोहचली आहे. त्यामुळे टीम इंडिया निश्चिंत आहे. मात्र टीम इंडिया आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्नात असणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकासमोर टीम इंडियाला रोखून विजय मिळवण्याचं आव्हान असणार आहे. हा सामना कुठे, कधी होणार हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका सामना केव्हा?

टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका सामना रविवारी 5 नोव्हेंबर रोजी खेळवण्या येणार आहे.

टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका सामना कुठे?

टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका सामना हा कोलकातामीधल ऐतिहासिक स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलं आहे.

टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका सामना किती वाजता सुरु होणार?

टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका सामना टीव्हीवर फुकटात डीडी स्पोर्ट्सवर पाहायला मिळेल. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरही मॅच पाहता येईल.

टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका सामना मोबाईलवर फुकटात कुठे बघायला मिळेल?

टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका सामना मोबाईलवर फुकटात पाहण्यासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार एप डाऊनलोड करावा लागेल.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव आणि रविचंद्रन अश्विन.

दक्षिण आफ्रिका टीम | टेम्बा बावुमा(कॅप्टन), क्विंटन डी कॉक(विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, गेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी, एंडिले फेहलुक्वायो, रीझा हेंड्रिक्स आणि लिझाद विल्यम्स.