मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. केपटाऊ येथे सुरू असलेल्या सामन्यात टीम इंडिया विजयापासून काही अंतर दूर आहे. आफ्रिका संघाचा दुसरा डाव 176-10 आटोपला. टीम इंडियाने पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीमुळे आता जिंकण्यासाठी फक्त 79 धावांचं लक्ष्य आहे. कसोटीमधील रोहित शर्मा याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये रोहित शर्मा याने फिल्डिंगवेळी आपला कडक फिटनेस दाखवला आहे. रोहितला वडापाव म्हणून ट्रोल करणाऱ्यांना त्याने उत्तर दिलं आहे.
रोहित शर्मा याला अनेकदा त्याच्या वाढलेल्या पोटावरून ट्रोल केलं जातं. वडापाव म्हणून त्याला मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं जातं. मात्र आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यामध्ये रोहितने संघातील सर्वोत्तम फिल्डर असलेल्या जडेजा याला मागे टाकलं. काइल व्हेरेन याने ऑफ साइडला शॉट खेळला होता. चौकार अडवण्यासाठी रोहित आणि जडेजा दोघेही धावले, यावेळी रोहत जड्डूपेक्षाही वेगाने धावताना दिसला. यावर कोणाचा विश्वास बसला नाही पण खरं आहे.
Everyone trolling Rohit Sharma for his fitness meanwhile him having a fun sprint with sir jadeja. pic.twitter.com/8MJ7ewdrLG
— __Rana__ (@Binitrana12) January 3, 2024
दरम्यान, रोहितने केलेली फिल्डिंग पाहून काही ट्रोलर्सनी त्याचं कौतुक केलं नाही. जडेजा स्लो पळाला असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र व्हिडीओमध्ये रोहित वेगाने धावत असलेला पाहायला मिळाला. ट्रोलर्सने काहीही बोलूदे पण हिटमॅनचे चाहते खूश आहेत.
डीन एल्गर (कॅप्टन), एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी
रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार