मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा मानहानिकारक पराभव झाला आहे. साऊथ आफ्रिका संघाने टीम इंडियावर एक डाव आणि 32 धावांनी विजय मिळवला आहे. या पराभसह दोन सामन्यांच्या मालिकेत यजमान आफ्रिका संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यासोबतच टीम इंडियाचं आफ्रिकेमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. या पराभवावर रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया देताना काय म्हटलं आहे जाणून घ्या.
आम्ही जिंकण्सासारखा खेळ केला नाही. ना गोलंदाजी ना फलंदाजी आम्ही काहीच चांगलं केलं नाही. कसोटी जिंकायची असेल तर आम्हाला एकजुटीने खेळावं लागणार जे या सामन्यात आम्ही केलं नाही. काही खेळाडू इथे खेळून गेलेत त्यामुळे नेमकं काय करायची गरज आहे हे त्यांना माहित आहे. के.एल. राहुल याने चांगली फलंदाजी केली आणि सन्मानजनक टार्गेटपर्यंत पोहोचवलं. होतं. पण आम्ही परस्थितीचा फायदा घेऊ शकलो नाही. दोन्ही डावात आम्ही चांगली फलंदाजी केली नाही त्यामुळे पराभव झाला. के.एल. राहुलने अशा खेळपट्टीवर कशा प्रकारे फलंदाजी करण्याची गरज आहे हे दाखवून दिलं असल्याचं रोहित शर्मा म्हणाला.
संघातील काही बॉलर्स याआधी इथे आले नाहीत. त्यामुले मला त्यांना काही बोलायचं नाही. सध्या आम्हाला पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे. पुढील कसोटीसाठी रेडी राहण्याची जास्त गरज असल्याचं रोहित म्हणाला. दुसऱ्या डावात विराट कोहली आणि शुबमन गिल यांना सोडता कोणालाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर, एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा