मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सात विकेटने विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी केलेल्या घातक गोलंदाजीसमोर आफ्रिका संघाने शरणागती पत्करली. यजमान संघाला त्यांच्याच होम ग्राऊंडमध्ये पराभूत करत टीम इंडियाने मोठा इतिहास रचला आहे. पहिल्या कसोटीमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलं. या सामन्यातील विजयानंतर रोहित शर्मा याने आफ्रिकेच्या एका खेळाडूला लवकरात लवकर आऊट करण्याचा प्लॅन असल्याचं सांगितलं आहे.
रोहित शर्मा याने सामना संपल्यावर बोलताना, गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये आम्ही भारताबाहेर मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलो होतो. मालिका जिंकली असती तर आणखी आनंद झाला असता पण आपण सर्व काही मिळवू शकत नाही. साऊथ आफ्रिका तगडा संघ असून नेहमीच तुम्हाला आव्हान देतो. दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये डीन एल्गर याची विकेट लवकरात लवकर घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. आफ्रिकेसाठी एल्गरने केलेली कामगिरी खूप कमी जणांना जमली आहे. क्वचितच असे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत असल्याचं रोहित शर्मा म्हणाला.
डीन एल्गर याने पहिल्या कसोटी सामन्यामध्ये 185 धावांची खेळी केली होती. या खेळीसह एल्गने विजयाचा पाया आफ्रिका संघाला रचून दिला होता. दुसऱ्या सामन्यात टेम्बा बावुमा नसल्याने एल्गरकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली होती. मात्र त्याला आपल्या नेतृत्त्वात संघाला विजय मिळवून देता आला नाही.
डीन एल्गर (कॅप्टन), एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी
रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार