आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील अंतिम फेरीतील दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर मात करत इतिहासात पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर टीम इंडियाने इंग्लंडचा 2 वर्षांपूर्वीचा हिशोब क्लिअर करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात लढत होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर एडन मारक्रम दक्षिण आफ्रिकेची धुरा सांभाळणार आहे. हा महामुकाबला कधी आणि कुठे होणार? हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका महाअंतिम सामना शनिवारी 29 जून रोजी होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस येथे होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी, ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, ब्योर्न फॉर्च्युइन आणि रायन रिकेल्टन.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.