India vs sri lanka 1st T20I Match : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात आजपासून 3 T20 सामन्यांची मालिकेला सुरुवात होत आहे. नव्यावर्षाची सुरुवात या मालिकेने होणार आहे. टीम इंडियाचं नेतृत्व हे नियमित कर्णधार रोहित शर्माऐवजी हार्दिक पंड्याकडे देण्यात आलंय. त्यामुळे हार्दिक टी 20 टीमची कॅप्टन्सी करणार आहे. टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडकून टीम इंडियाचा मानहानीकारक पराभव झाला. त्यानंतर टी 20 क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलण्याची चर्चा सुरु झाली होती. श्रीलंकेविरुद्धची टी 20 सीरीज त्याच दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे. (India vs sri lanka 1st T20I Live Socre today IND vs SL match Streaming and cricket highlights updates latest news in Marathi)
BCCI च्या निवड समितीने या सीरिजमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना विश्रांती दिली आहे. युवा खेळाडूंकडे आपली छाप उमटवण्याची संधी आहे. हार्दिकची टी 20 टीमच्या कर्णधारपदी कायमस्वरुपी निवड होण्याची शक्यता आहे. अजून या संदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही. नेतृत्वगुण सिद्ध करण्याच्या दृष्टीने हार्दिकसाठी सुद्धा ही मालिका महत्त्वाची आहे.
टीम इंडियाने श्रीलंकेवर पहिल्या टी 20 सामन्यात 2 धावांनी थरारक विजय मिळवलाय. श्रींलकेला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज होती. मात्र दुसरी चोरटी घाव घेण्याच्या प्रयत्ना धाव घेण्याच्या प्रयत्नात ऑस्ट्रेलिया 160 धावांवर ऑलआऊट झाली.
शिवम मावीने श्रीलंकेची सेट झालेली दासून शनाका आणि वानिंदु हसरंगा ही जोडी फोडून काढली आहे. मावीने हसरंगाला आऊट करत श्रीलंकेला सहावा झटका दिला आहे. वानिंदु 10 रन्स करुन आऊट झाला.
श्रीलंकेने पाचवी विकेट गमावली आहे. हर्षल पटेलने भानुका राजपक्षाला 10 धावांवर कॅप्टन हार्दिक पटेलच्या हाती कॅचा आऊट केलं. त्यामुळे श्रीलंकेची 10.4 ओव्हरनंतर 68-5 अशी स्थिती झाली आहे.
श्रीलंकेने दुसरी विकेट गमावली आहे. शिवम मावीने धनंजय डी सिल्वाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.
शिवम मावीने श्रीलंकेला पहिला झटका दिला आहे. पाथुम निसांका 1 रन करुन आऊट झाला आहे.
श्रीलंकेच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. 163 रन्सच्या विजयी आव्हानासाठी पाथुम निसांका आणि कुसल मेंडीस ही सलामी जोडी मैदानात उतरली आहे.
दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल या दोघांनी अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 163 धावांचं सन्मानजनक टार्गेट दिलंय. टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स गमावले. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली. मात्र त्यानंतर दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल या दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाला 150 पेक्षा अधिक धावांचा टप्पा ओलांडता आला. टीम इंडियाकडून हुड्डाने नाबाद 41* आणि अक्षर पटेलने 31* धावा केला.
भारताला पाचवा झटका लागलाय. कर्णधार हार्दिक पंड्या 29 धावा करुन माघारी परतलाय.
हार्दिक पंड्या : 27 बॉल 29 रन्स, 4 फोर
टीम इंडियाने चौथी विकेट गमावली आहे. सेट बॅट्समन ईशान किशन आऊट झाला आहे.
ईशान किशन :
टीम इंडियाने तिसरी विकेटही गमावली आहे. शुबमन गिल, सूर्यकुमार यादवनंतर संजू सॅमसनही आऊट झाला आहे. संजू 5 धावा करुन तंबूत परतला.
टीम इंडियाने पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 41 धावा केल्या आहेत. शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव या दोघांच्या रुपात टीम इंडियाने 2 विकेट्स गमावले.
41-2, 6 Overs.
टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली आहे. टीम इंडियाचा स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादव 7 धावा करुन माघारी परतला. वानखेडे स्टेडियम सूर्यकुमारचं होमग्राऊंड आहे. तसते तो गेल्या काही काळापासून सातत्याने शानदार कामगिरी करतोय. त्यामुळे सूर्यकुमारकडून जोरदार कामगिरीची अपेक्षा होती. मात्र सूर्या निराशा करुन माघारी परतला.
1ST T20I. WICKET! 5.1: Suryakumar Yadav 7(10) ct Bhanuka Rajapaksa b Chamika Karunaratne, India 38/2 https://t.co/VusD2RXZFT #INDvSL @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 3, 2023
टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आहे. टी 20 मध्ये पदार्पण केलेला शुबमनस गिल 7 धावा करुन माघारी परतला आहे. गिल आणि ईशान किशन या दोघांनी 27 धावांची सलामी भागीदारी केली.
टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झालीय. सलामीला इशान किशन आणि शुबमन गिल मैदानात आले आहेत. या दोघांनी सुरुवातीपासूनच जोरदार खेळाला सुरुवात केली आहे. पहिल्या 2 ओव्हरनंतर टीम इंडियाच्या 26 धावा झाल्या आहेत.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निशंका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजय डी सिल्वा, चारिथा असालंका, भानुका राजपक्षा, वानिंदु हसारंगा, चामिका करुणारत्ने, महीश तीक्षणा, कासुन रचिता आणि दिलशान मधुशंका.
1ST T20I. Sri Lanka XI: D Shanaka (c), P Nissanka, K Mendis (wk), D De Silva, C Asalanka, B Rajapaksa, W Hasaranga, C Karunaratne, M Theekshana, K Rajitha, D Madushanka. https://t.co/VusD2RXZFT #INDvSL @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 3, 2023
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, हर्षल पटेल, शिवम मावी, उमरान मलिक आणि युजवेंद्र चहल.
Sri Lanka have won the toss and they will bowl first in the 1st T20I.
A look at our Playing XI for the game.
Live – https://t.co/uth38CaxaP #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/7cIfzgkttT
— BCCI (@BCCI) January 3, 2023
श्रीलंकेने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया पहिले बॅटिंग करणार आहेत.
शुबमन गिल आणि शिवम मावी या दोघांचं श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यातून पदार्पण झालं आहे. सूर्यकुमार यादवने शुबमनला तर कॅप्टन हार्दिकने मावीला कॅप देऊन स्वागत केलं. बीसीसीआयने हे फोटो ट्विट केले आहेत.
Congratulations to @ShubmanGill & @ShivamMavi23 who are all set to make their T20I debut for #TeamIndia ???
Live – https://t.co/uth38CaxaP #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/gl57DXG3x6
— BCCI (@BCCI) January 3, 2023
पहिल्या टी 20 सामन्यासाठी थोड्याच वेळात टॉस होणार आहे. टॉससाठी टीम इंडियाचा कॅप्टन हार्दिक पंड्या आणि श्रींलकेचा कर्णधार दासुन शनाका मैदानात येतील.